मुंबई : बॉलिवूडचा हॅंडसम हंक अभिनेता हृतिक रोशन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघांनीही हे रिलेशन अधिकृतरित्या सांगितलं नाही. मात्र अनेक ठिकाणी या लव्हबर्ड्सला सोबत स्पॉट केलं जातं. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामुळे हे दोघेही कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर याविषयी अनेक चर्चा होताना दिसत आहेत. त्यामुळे हृतिक आणि सबा खरंच लग्नागाठ बांधणार आहे का? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय. अद्याप दोघांनीही लग्नाविषयी कोणतीही अधिकृत बातमी दिलेली नाही. तरीही ही बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हृतिक आणि सबा यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हृतिकला पहिल्यांदा सबासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर दोघांना करण जौहरच्या पार्टीतही एकत्र स्पॉट करण्यात आलं. यावेळी दोघांनीही कॅमेऱ्यासमोर सोबत पोझ दिली. याशिवाय नुकतेच दोघेही लंडनला गेले होते. लंडनमधील त्यांचे काही फोटोही समोर आले होते. सबानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही काही फोटो शेअर केलेले पहायला मिळाले. सबा ही हृतिकपेक्षा 12 वर्षांनी छोटी आहे