Vikram Vedha First Look : हृतिक रोशनने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली भेट, 'वेधा'चा फर्स्ट लूक शेअर केला

बी टाऊन
Updated Jan 10, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hrithik Roshan Birthday : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे, ज्यामध्ये तो वेधाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांना हृतिकचा हा लूक खूप आवडला आहे.

Hrithik Roshan shared a first look of 'Vedha'
'विक्रम वेधा'मध्ये हृतिक रोशन साकारणार खलनायक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'विक्रम वेधा'मध्ये हृतिक रोशन साकारणार खलनायक
  • 'वेधा'चा फर्स्ट लूक हृतिक रोशनने शेअर केला
  • सुपरहिट तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे 'विक्रम वेधा'

Hrithik Roshan As Vedha: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन  (Hrithik Roshan)  आज त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिकचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच चाहते हृतिकच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो लवकरच सैफ अली खानसोबत विक्रम वेधा (Vikram Vedha)  या चित्रपटात दिसणार आहे. वाढदिवसानिमित्त हृतिकने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. हृतिकने  (Hrithik Roshan)  त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक  (Vikram Vedha First Look) शेअर केला आहे. हे पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. विक्रम वेधा (Vikram Vedha)  30 सप्टेंबर 2022 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

चित्रपटातील हृतिकचा (Hrithik Roshan) लूक रस्टी आहे. फोटोमध्ये त्याने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. दाढी वाढली आहे आणि सनग्लासेस घातले आहेत. तसेच त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. फर्स्ट लूक शेअर करताना हृतिकने लिहिले – वेधा.

चाहत्यांना हृतिकचा लूक खूपच आवडला

हृतिकचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. ते त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहे. एका चाहत्याने लिहिले - फायर... फायर. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले - यार, किती मस्त दिसत आहे. हृतिकच्या या पोस्टला काही मिनिटांतच 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

विक्रम वेधा हा  तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सिनेमात हृतिक गँगस्टर वेधाच्या भूमिकेत तर सैफ अली खान (Saif Ali Khan) पोलीस अधिकारी विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच राधिका आपटे (Radhika Apte)  या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी या सिनेमासाठी आमिर खानला (Aamir Khan) फायनल करण्यात आले होते, मात्र नंतर आमिरऐवजी हृतिक रोशनने हा सिनेमा साईन केला.

हृतिक रोशन विक्रम वेधाशिवाय दीपिका पदुकोणसह फायटरमध्ये दिसणार आहे. तसेच सध्या तो क्रिश 4 च्या तयारीत व्यस्त आहे. मात्र, आज हृतिकने त्याच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलेली भेट चाहत्यांच्या पसंतीस उतरतेय एवढं मात्र नक्की. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी