Hrithik Roshan : हृतिक रोशनचा नम्रपणा, फॅन्सचं जिंकल मनं; Video सोशल मीडियावर Viral

बी टाऊन
Updated Aug 28, 2022 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hrithik Roshan : विक्रम वेधाच्या टीझरनंतर (Vikram Vedha teaser) सध्या सगळीकडेच हृतिक रोशनची (Hrithik Roshan) चर्चा आहे.त्याच्या अभिनयाचं सारेच कौतुक करत आहेत. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होतोय. हा व्हिडिओ पाहून सारेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आपल्या एका चाहत्याच्या पाया पडताना दिसत आहे. तसेच त्याला गिफ्टही दिलेले आहे. हृतिकचा विनम्रपणा चर्चेचा विषय ठरतोय.

Hrithik Roshan touched fans feet
Hrithik Roshan च्या विनम्रतेपुढे फॅन्सही झुकले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हृतिक रोशनचा नम्रपणा साऱ्यांनाच अचंबित करणारा
  • विक्रम-वेधाच्या टीझरनंतर सगळीकडे हृतिकची चर्चा
  • एका लाईव्ह इव्हेंटमध्ये हृतिक रोशन चक्क फॅन्सच्या पाया पडला.

Hrithik Roshan : बॉलिवूडमधील सर्वात नम्र अभिनेता अशी हृतिक रोशनची (Hrithik Roshan) ओळख आहे. त्याचाच प्रत्यय आला मुंबईत झालेल्या एका लाईव्ह इव्हेटमध्ये. या इव्हेंटमध्ये हृतिक रोशन चक्क आपल्या एका फॅनच्या पाया पडला. हृतिकचा हा विनम्रपणा पाहून सगळीकडेच त्याचं कौतुक होताना दिसतंय. सध्या हृतिक त्याच्या विक्रम वेधा (Vikram Vedha teaser) या सिनेमातील भूमिकेमुळे खूपच चर्चेत आहे. नुकताच त्याचा टीझरही रिलीज झालेला आहे. सिनेमात हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) सैफ अली खानही (Saif Ali Khan) दिसणार आहे. (Hrithik Roshan touched fans feet and hugged him heart winning video)

त्याचं झालं असं की, हृतिक रोशनचा एक चाहता स्टेजवर आला आणि त्याने हृतिकला वाकून नमस्कार केला. लगेचच हृतिकही त्या चाहत्याच्या पाया पडला. हे पाहून त्या चाहत्यालासुद्धा भरून आलं. त्यानंतर हृतिकने आपल्या या चाहत्यासोबत फोटोसाठी पोजही दिली. एवढंच नाही तर त्याला गिफ्टही दिलं. हे सारं काही पाहून हृतिकचा हा फॅन पुरता भारावून गेला. हृतिक रोशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सगळीकडे हृतिक रोशनच्या या नम्रपणाचं तोंडभरून कौतुक केलं जातं आहे. 

अधिक वाचा : शिल्पा शिंदेनं चाहत्यांकडून मागितले बर्थडेचं गिफ्ट

नेहमीप्रमाणेच या इव्हेंटमध्येही हृतिक रोशनची हटके फॅशन स्टाईल पाहायला मिळाली. यावेळी हृतिकने निऑन ग्रीन ब्लेझर आणि पांढरी पँट वेअर केली होती. तर निऑन ग्रीन रंगाचाच टीशर्ट घातलेला होता. काळ्या सनग्लासेस आणि पांढऱ्या कॅपसह हृतिकने त्याचा लूक पूर्ण केला.

अधिक वाचा : 'या' अभिनेत्रीसमोर Rubinaला दाखवायचं आहे Talent

नुकताच हृतिक रोशनच्या विक्रम वेधा या सिनेमाचा टीझर रिलीज झालेला आहे. सिनेमात हृतिक रोशन वेधा या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रम वेधा हा पुष्कर-गायत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे. विक्रम वेधा सिनेमात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. पोलीस विक्रम (सैफ अली खान) वेधा (हृतिक रोशन) 
या भयानक गुंडाचा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघतो. उंदारा-मांजराचा खेळ सुरु होतो. मूळच्या तामीळ सिनेमात अभिनेते आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते. तामिळमध्येही सिनेमाचं नाव तेच होतं. अग्निपथनंतर पुन्हा एकदा हृतिक रोशन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील हृतिक आणि सैफची ही जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. येत्या 30 सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी