कॅन्सरच्या उपचारादरम्यान जेव्हा मुलाला मिठी मारून रडले होते राकेश रोशन...

बी टाऊन
Updated Jul 09, 2019 | 12:43 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकतेच सांगितले की त्याचे वडील राकेश रोशन किती स्ट्रॉंग आहेत ते. मात्र एकदा त्यांना रडू कोसळले होते. कँन्सरच्या उपचारादरम्यान कसे ते मनाने हताश झाले होते.

hritik and rakesh
हृतिक रोशन 

थोडं पण कामाचं

  • राकेश रोशनला झाला होता कॅन्सर
  • हृतिकने सोशल मीडियावरून दिली होती माहिती
  • राकेश रोशनसोबत शेअर केला होता फोटो

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये कॅन्सर झालेल्या अशा काही बॉलिवूडच्या कलाकारांची नावे पुढे आली जी ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला. यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे, ऋषी कपूर, इरफान खान या कलाकारंचा समावेश आहे. या सगळ्यात अभिनेता राकेश रोशन यांचे नावही पुढे आले होते. ते या गंभीर आजाराने ग्रस्त होते. राकेश रोशनचा मुलगा हृतिक रोशनने पोस्टद्वारे याची माहिती दिली होती. 

नुकतेच त्याने सांगितले की एका एकदा एका प्रश्नावर त्याचे वडील त्याला मिठी मारून रडले होते. हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी सिनेमा सुपर ३०च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वडिलांबद्दलचा किस्सा सांगितला होता. यावेळी त्याने आपल्या वडिलांनी कॅन्सरशी कसा लढा दिला हे सांगितले होते. तो म्हणाला, माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये पुरुषांना सांगितले जाते की ते डोंगरासारखे असतात. एक वडील ते असतात जे आपली कोमलात दाखवत नाहीत. अश्रू ढाळणे म्हणजे बायकांसारखे असे शिकवलेले असते. मात्र मी शिकलो की नाही रडणे ही तुमची ताकद नसतो. मला वाटले की माझ्या वडिलांनी त्यांच्या मनात असे काहीतरी दाबून ठेवले होते जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. एक दिवस मी त्यांना उपचारादरम्यान कसे वाटत आहे हे सांगण्यासाठी प्रवृत्त केले. 

हृतिक पुढे म्हणाला, एक दिवस ते पूर्णपणे कोसळले होते. मी त्यांना मिठी मारली आणि आमच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या दरम्यान एकीकडे ते रडत होते तर दुसरीकडे ते वडील म्हणून माझी सात्वंना करत होते. आपल्याला मोकळेपणाने आपल्या भावनांना वाट करून दिली पाहिजे. जेव्हा हृतिक रोशनने आपल्या वडिलांना कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती तेव्हा त्याने एक फोटो शेअर केला होता यात दोघेही जिममध्ये उभे असलेले दिसत होते. 

हृतिकने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती की त्याचे वडील गंभीर आजाराशी लढत आहेत. त्याने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर करून म्हटले होते की, आज सकाळी मी वडिलांना जिममध्ये येण्याविषयी विचारले कारण मला माहीत आहे की सर्जरीच्या दिवशीही ते वर्कआऊट मिस करणार नाहीत. ते कणखर लोकांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गळ्यात Squamous Cell Carcinoma असल्याचे समोर आले. ते आपली लढाई लढतीस. एक कुटुंब म्हणून आम्ही खरंच नशिबवान आहोत की आम्हाला त्यांच्यासारखा लीडर मिळाला. लव्ह यू डॅड..

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हृतिक सध्या सुपर३०मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा बिहारच्या आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार सुपर ३० कोचिंगचे संस्थापक आहेत. हा सिनेमा १२ जुलैला रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कॅन्सरच्या उपचारादरम्यान जेव्हा मुलाला मिठी मारून रडले होते राकेश रोशन... Description: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकतेच सांगितले की त्याचे वडील राकेश रोशन किती स्ट्रॉंग आहेत ते. मात्र एकदा त्यांना रडू कोसळले होते. कँन्सरच्या उपचारादरम्यान कसे ते मनाने हताश झाले होते.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles