टिक टॉक यूजरनं हृतिकच्या गाण्यावर केला डान्स, हृतिक म्हणाला, कोण आहे हा?

बी टाऊन
Updated Jan 14, 2020 | 16:03 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

अभिनेत्री-अभिनेत्यांचे फॅन्स त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. अनेक जण त्यांना फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशनच्या फॅनचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बघा हा व्हिडिओ...

Hritik Roshan
तरुणाचा डान्स पाहून हृतिकही अवाक 

थोडं पण कामाचं

  • टिक टॉक व्हिडिओमध्ये तरुणाचा डान्स पाहून हृतिक हैराण
  • आपल्या ऑफिशिअल ट्विटरवरून शेअर केला व्हिडिओ
  • सोशल मीडियावर व्हिडिओची धूम

मुंबई: बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन आपल्या नृत्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. जितके परफेक्ट आणि स्मूद त्याच्या डान्स मूव्ह्स असतात, तशा बॉलिवूडमध्ये कदाचितच दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याच्या असतील. मात्र त्याच्या एका फॅनचा टिक टॉक व्हिडिओ पाहून हृतिक स्वत: खूप आश्चर्यचकीत झालाय. नुकताच हृतिकनं त्याच्या फॅनचा टिक टॉक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या घराच्या छतावर हृतिकच्या गाण्यावर जबरदस्त एअर वॉक करताना दिसतोय. २ मिनीट २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये असं काही खास आहे की, आपण बघतच राहाल.

व्हिडिओमध्ये आपल्या छतावर एअर वॉक करणाऱ्या हृतिकच्या फॅनचा व्हिडिओ पाहून अनेक जण प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे हृतिकला सुद्धा या डान्स मूव्ह्स खूप आवडल्या. हृतिकनं आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं, ‘आतापर्यंतचा सर्वात स्मूद एअरवॉक जो मी पाहिलाय. कोण आहे हा तरुण?’

 


वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर हृतिकचा मागील चित्रपट होता वॉर. चित्रपटात त्यानं टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटानं केवळ बॉक्स ऑफिसवरच धूम केली नाही. तर क्रिटिक्सनं सुद्धा चित्रपटाची खूप प्रशंसा केली. चित्रपटात हृतिक आणि टायगर श्रॉफचा डान्स नंबर जय जय शिव शंकर खूप चर्चेत होता. डान्समध्ये हृतिक रोशन टायगर श्रॉफवर चांगलाच भारी पडतांना दिसत होता.

ट्विटर यूजरनं हृतिक रोशनला टॅग करत या मुलाचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘शेवटपर्यंत पाहा, मी सगळे व्हिडिओ जोडून हा बनवला आहे. या प्लीज प्रसिद्धी द्या’.

एअरवॉक करणाऱ्या या तरुणाचं नाव युवराज सिंह आहे. त्याच्या व्हिडिओला टिक टॉकवर १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानं आतापर्यंत अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. ज्यात तो मूनवॉक करतांना दिसतो. टिक टॉकवर आतापर्यंत या व्हिडिओला ११.३ मिलियन लाईक्स मिळालेले आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी