हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ची बंपर कमाई सुरू, सहाव्या दिवशी एवढा कमावला गल्ला

बी टाऊन
Updated Jul 18, 2019 | 20:42 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

हृतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर ३०’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिली तर लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये ‘सुपर ३०’ सामिल होईल.

Hritik Roshan
हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ची बंपर कमाई सुरू, पाहा किती कलेक्शन  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुपर ३०ची घोडदौड सुरूच
  • सुपर ३० लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये
  • हृतिक रोशनची मुख्य भूमिका

Hrithik Roshan Super 30: बॉलिवूडचा ग्रीफ गॉड म्हणून ओळख असलेला अभिनेता हृतिक रोशनचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करतोय. वीकेंडला तर चित्रपट कमाई करतोच आहे, पण वीकडेजमध्येही चित्रपटानं चांगली मजल मारलीय. चित्रपटात हृतिक बिहारच्या आनंद कुमार यांच्या भूमिकेत आहे. या भूमिकेमध्ये आणि हृतिकचा बिहारी पणा प्रेक्षकांना खूप भावतोय. सुपर ३० हळुहळू १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल करतोय.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. सुपर ३०नं आठवड्याच्या प्रत्येक दिवशी चांगली कमाई केलीय. चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ११.८३ कोटींचा गल्ला जमला, तर शनिवारी १८.१९ कोटी, रविवारी २०.७४ कोटी, सोमवारी ६.९२ कोटी, मंगळवारी ६.३९ कोटी आणि बुधवारी ६.१६ कोटींची बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं कमाई केलीय. याची बेरीज केली तर ‘सुपर ३०’नं आतापर्यंत ७०.२३ कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. जी हृतिकच्या आधीच्या दोन चित्रपटांच्या तुलनेत खूप चांगली आहे. हृतिकचे आधीचे चित्रपट मोहनजोदडो आणि काबिलनं एव्हढी कमाई केलेली नव्हती.

 

 

‘सुपर ३०’च्या एकूण कमाईमधील सर्वाधिक वाटा मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा आहे. शुक्रवारपासून तर बुधवारपर्यंत मुंबईत जिथं २१.५० कोटी रुपये चित्रपटानं कमावले, तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशात १४.५३ कोटींचा बिझनेस केलाय.

 

आता या चित्रपटासोबत स्पर्धा

सुपर ३० रिलीज झाला तेव्हा दुसरा कोणताही चित्रपट रिलीज झाला नव्हता, मात्र आता या आठवड्यात हॉलिवूड चित्रपट ‘द लायन किंग’ सोबत त्याची स्पर्धा असेल. ‘द लायन किंग’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी वर्जनमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खाननं आपला आवाज दिलाय. त्यामुळे आता सुपर ३० या चित्रपटाला किती टक्कर देतो, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

चित्रपटाची कथा

पाटणा इथल्या आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. आनंद कुमार यांनी सुपर ३० नावाची संस्था सुरू केली. यात आर्थिक बाबतीत गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण दिलं. ही संस्था सुरू करणं आणि ती यशस्वीपणे चालवतांना अनेक संकटांचा सामना आनंद कुमार यांना करावा लागला होता. सुपर ३० चित्रपटात त्यांचा हाच संघर्ष दाखवला गेला आहे. यात अभिनेता हृतिक रोशन सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलंय.

 

 

वर्क फ्रंट

सुपर ३० नंतर आता हृतिक रोशन ‘वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात पहिल्यांचा हृतिक आणि टायगर श्रॉफ एकत्र दिसतील. नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यात हृतिक आणि टायगर एकमेकांसोबत फाईट करतांना दिसले. चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर आहे. वॉर २ ऑक्टोबर २०१९ ला रिलीज होणार आहे. याशिवाय हृतिक रोशन ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये काम करतोय. यात तो अमिताभ बच्चन यांची भूमिका निभावणार आहे.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ची बंपर कमाई सुरू, सहाव्या दिवशी एवढा कमावला गल्ला Description: हृतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर ३०’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिली तर लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये ‘सुपर ३०’ सामिल होईल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...