प्रेक्षकांवर ह्रतिक रोशनची जादू, 'सुपर 30' ने दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

बी टाऊन
Updated Jul 14, 2019 | 18:05 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Super 30 movie box office collection: बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन याच्या 'सुपर 30' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत सिनेमाने दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केलीय

Super 30 movie box office collection
ह्रतिक रोशनच्या 'सुपर 30' सिनेमाची चांगली कमाई 

थोडं पण कामाचं

  • ह्रतिकच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मनं
  • पहिल्या दिवसाच्या तुलनेत सिनेमाची अधिक कमाई
  • लवकरच 50 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता

मुंबई: बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन याच्या सुपर 30 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरूवात केली असून कमाई सुद्धा चांगली करत आहे. या सिनेमात अभिनेता ह्रतिक रोशन हा आयआयटी कोचिंग देणाऱ्या 'सुपर 30' संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या भूमिकेत आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात ह्रतिक रोशन याने खूपच चांगला अभिनय केला आहे. सुपर 30 सिनेमाने दुसऱ्या दिवशी नेमकी किती कमाई केली आहे याची आकडेवारी आली आहे.

सुपर 30 सिनेमात ह्रतिक रोशन याने केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आगामी काळात हा सिनेमा आणखीन चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. फिल्म क्रिटिक्सच्या मते या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, सिनेमाने दुसऱ्या दिवशी 18.19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे तर पहिल्या दिवशी सिनेमाने 11.83 कोटी रुपयांची कमाई केली होती. यामुळे सुपर 30 सिनेमाची आतापर्यंतची कमाई 30.02 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

विशेष म्हणजे सुपर 30 या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगली आणि अधिक कमाई केली आहे. इतकचं नाही तर सुपर 30 या सिनेमाने ह्रतिक रोशन याच्या 'काबिल' आणि 'मोहंजोदारो' या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं आहे.

ह्रतिक रोशन याच्या 'काबिल' या सिनेमाने पहिल्या दिवशी 10.43 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता तर 'मोहंजोदारो' या सिनेमाने 8.8 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे सुपर 30 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांना मागे टाकलं आहे. या सिनेमाची आतापर्यंतची कमाई पाहता हा सिनेमा लवकरच 50 कोटींच्या घरात पोहोचेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आनंद कुमार यांनी सायकलवर पापड विकून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. आनंद कुमार यांचा संघर्ष सुपर 30 या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखवला आहे. या सिनेमाचं फिल्म क्रिटिक्ससोबतच प्रेक्षकांनीही कौतुक केलं आहे. या सिनेमात ह्रतिक रोशन याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा विकास बहल यांनी दिग्दर्शित केला आहे.

ह्रतिक रोशनचा उत्तम अभिनय

सुपर 30 हा सिनेमा आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित असून या सिनेमात ह्रतिक रोशन याने खूपच चांगला अभिनय केला आहे. आनंद कुमार यांच्या चालण्याच्या स्टाईलपासून बोलण्यापर्यंत ह्रतिकने अगदी हुबेहुब अभिनय केला आहे. ह्रतिक रोशन याच्यासोबतच पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकूर, नंदीश संधू यांनी सुद्धा उत्तम अभिनय केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
प्रेक्षकांवर ह्रतिक रोशनची जादू, 'सुपर 30' ने दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई Description: Super 30 movie box office collection: बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन याच्या 'सुपर 30' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत सिनेमाने दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केलीय
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...