Huma Qureshi Birthday: एक हजार रूपये घेऊन नशीब आजमावण्यासाठी आली मुंबईत, आता 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

बी टाऊन
Updated Jul 28, 2022 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Huma Qureshi Birthday Net Worth: आज (28 जुलै) बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा वाढदिवस आहे. हुमा कुरेशीचा जन्म 1986 मध्ये दिल्लीत झाला होता. नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेल्या हुमा कुरेशीची संपत्ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Huma Qureshi Birthday Net Worth
हुमा कुरेशीची नेट वर्थ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज (28 जुलै) बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा वाढदिवस आहे.
  • हुमा कुरेशीचा जन्म 1986 मध्ये दिल्लीत झाला होता.
  • हजार रुपये घेऊन मुंबईत पोहोचलेली हुमा कुरेशी कोट्यवधींची मालकीण आहे

Huma Qureshi Birthday Net Worth: आज (28 जुलै) बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा वाढदिवस आहे. हुमा कुरेशीचा जन्म आजच्या दिवशी 1986 मध्ये दिल्लीत झाला होता. हुमा कुरेशीचा अभिनेत्री होण्याचा प्रवास खूपच मनोरंजक होता. हुमाचे बालपण दक्षिण दिल्लीत गेले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर तिने थिएटर करायला सुरुवात केली. काही काळानंतर ते पद मिळवण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली. एक हजार रुपये घेऊन तिने मुंबई गाठली होती.

अधिक वाचा : Video: अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमाचं नवं गाणं रिलीज

अनेकवेळा असे झाले की तिला उपाशी झोपावे लागले पण तिने हार मानली नाही. ती दिल्लीत परत आली नाही आणि मुंबईत संघर्ष करत राहिली. काही वेळाने तिला सॅमसंगची जाहिरात मिळाली आणि ही जाहिरात अनुराग कश्यपने पाहिली. त्यानंतर तिचा पहिला सिनेमा गँग्स ऑफ वासेपूर आला. या सिनेमामुळे हुमा रातोरात स्टार बनली. यानंतर तिने गँग्स ऑफ वासेपूर 2, डी-डे, बदलापूर, डेढ़ इश्किया, हायवे, जॉली एलएलबी यांसारख्या सिनेमांमधून आपले स्थान निर्माण केले.

अधिक वाचा : रोशनी मलहोत्रा ठरल्या सर्वात श्रीमंत महिला

हुमाचे वडील सलीम कुरेशी दिल्लीत रेस्टॉरंट चालवतात. दिल्लीत सलीम नावाच्या जवळपास दहा रेस्टॉरंटची त्यांची साखळी आहे. याशिवाय हुमाने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. आज ती खूप आलिशान जीवन जगते आणि तिने जे काही मिळवले ते स्वबळावर. fimlydivas.com च्या रिपोर्टनुसार, हुमा कुरेशीची 23 कोटींची (Huma Qureshi Net Worth) संपत्ती आहे.

अधिक वाचा : पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य नाही - राऊत

हुमा कुरेशीची फी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुमा कुरेशी एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये घेते. ती जाहिरात, मॉडेलिंग आणि चित्रपटांमधून कमाई करते. तिच्याकडे SUV Land Rover Freelander, Mercedes Benz सारखी वाहने आहेत. तिला लक्झरी कारची खूप आवड आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी