Shefali Shah new web series : वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्य उलगडणार 'ह्युमन', शेफाली शाह प्रमुख भूमिकेत

बी टाऊन
Updated Dec 23, 2021 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shefali Shah new medical drama: 'ह्यूमन' ही डिस्ने हॉटस्टारची आगामी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैद्यकीय जग, त्या जगात घडणाऱ्या अनपेक्षित घटना, त्याचा सामान्यांवर होणारा परिणामावर भाष्य करण्यात येणार आहे.

Shefali Shah in the lead role in the thrilling medical drama 'Human'
वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्य उलगडणार 'ह्युमन'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • थरारक, अँक्शन वेबसीरिज 'ह्यूमन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • वैद्यकीय जगातील अनपेक्षित रहस्य हा ड्रामा उलगडणार आहे
  • वैद्यकीय जग आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम उलगडणार

Shefali Shah's new medical drama on disney-hotstar:  कोरोनाची भयंकर साथ सुरूच आहे. आता ओमायक्रॉन नावाचं संकट आलंय. या संकटाशी सामना करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस सारेच वैद्यकीय अधिकारी जीवाचं रान करत आहेत. हेच वैद्यकीय जग, थरारक मेडिकल ड्रामा 'ह्युमन' या वेबसीरिजमधून तुमच्या भेटीला येणार आहे. वैद्यकीय जगाची अनपेक्षित अशी रहस्य यात उलगडत जातात. ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम यावर भाष्य करणार आहे. अभिनेत्री शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिजचं लेखन मोझेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी केलेले आहे. ही पॉवर पॅक्ड सीरिज सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि विपुल अमृतलाल शाह आणि मोजेझ सिंग यांनी दिग्दर्शित केली आहे. 


या सीरिजबद्दल बोलताना, निर्माता आणि सह-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह म्हणाले की, "मी ३ वर्षे 'ह्युमन'च्या स्क्रिप्टवर एक चित्रपट म्हणून काम करत होतो तेव्हा मला लक्षात आले की याचा विषय दोन ते अडीच तासाच्या चित्रपटामध्ये बसवता येणे शक्य नाही. त्यानंतर मी मोजेझ सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना स्क्रिप्ट दिली. त्यांनी ती वाचली आणि त्यांना ती खूप आवडली आम्हाला या सीरिजमध्ये वैद्यकीय जगाचे अचूकपणे प्रतिनिधित्व करतानाच यातील पात्रांचे वैयक्तिक नातेसंबंध आणि त्यांच्या संघर्षाचे देखील चित्रण करायचे होते. आणि आम्हाला विश्वास आहे आणि आशा आहे की प्रेक्षकांना ही सीरिज नक्कीच आवडेल.”

आता वैद्यकीज जगतावर भाष्य करणारी ही सीरिज प्रेक्षकांच्या खरंच पचनी पडते का ते लवकरच कळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी