Actress Jaya Bachchan Birthday: आज अभिनेत्री जया बच्चन यांचा 75 वा वाढदिवस आहे. या दिवशी त्यांनी सांगितलेला एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत. अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांना रोमँटिक वाटत नाहीत. चित्रपटात अभिनेत्रीशीं प्रेम प्रसंग चित्रित करताना अमिताभ किती रोमँटिक वाटतात, पण तेच अमिताभ रिअल लाईफमध्ये मात्र लाजाळू आहेत आणि रोमँटिक नसल्याचं जया बच्चन यांनी खुलासा एका मुलाखतीत केलाय.
अधिक वाचा :पिवळी साडी नेसून भोजपुरी अभिनेत्रींने लावली आग
बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोडी 'एक नजर' चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडली होती आणि त्यांनी 1973 साली लग्न बंधनात अडकले. मात्र ज्या व्यक्तीशी जया यांनी प्रेमविवाह केला तेच अमिताभ बच्चन त्यांना रोमँटिक वाटले नाहीत. खुद्द जया बच्चन यांनी सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये याबाबात सांगितले होते. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन एकदा सिमी गरेवाल यांचा सुपरहिट शो 'रेन्डेव्हस विथ सिमी गरेवाल'मध्ये सहभागी झाले होते. यावेळी जया यांना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी पती म्हणून अमिताभ यांना किती रेटिंग द्याल,अमिताभ हे रोमॅंटिक आहेत का? यावेळी अमिताभ रोमॅंटिक नाही, असा खुलासा जया बच्चन यांनी केला होता.
अधिक वाचा : लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं
अमिताभ रोमँटिक आहेत का? असा सवाल सिमी यांनी विचारताच स्वत:अमिताभ यांनी पूर्णपणे नकार दिला. तर जया यांचे असे उत्तर होते की, 'माझ्यासोबत नाही'. पण मुलाखतीत अमिताभ यांनी सिमी यांना विचारले की त्यांना रोमँटिक म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे आणि नेमके विचारायचे काय आहे? सिमी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर जया म्हणाल्या होत्या की, रोमँटिक म्हणजे वाईन आणणे, फुले आणणे. त्यानंतर जया यांनी हे प्रकरण हाताळत अमिताभ खूप लाजाळू असल्याचे म्हटले.
अधिक वाचा : इंडिपेंडेंट मुलीला सून बनवायचं असेल तर या गोष्टी ठेवा डोक्यात
यानंतर जया बच्चन पुढे म्हणाल्या की, मला अमिताभ रोमँटिक वाटत नाही. पण कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असते तर त्यांनी हे सर्व (फुले आणि वाईन आणणे) केले असते, पण त्यांच्याबाबतीत अमिताभ यांनी असे केले असते असे वाटले नाही.