Pornography Case: पॉर्न प्रकरणात मला अडकण्यात आलं, प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; राज कुंद्राची मागणी

बी टाऊन
भरत जाधव
Updated Sep 30, 2022 | 12:46 IST

Pornography Case: पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याप्रकरणी राज कुंद्राला 19 जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉर्पसह अटक करण्यात आली होती.अलीकडेच राज कुंद्रा यांनी किल्ला न्यायालयात पोर्नोग्राफी प्रकरणी डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता, त्यावर गुन्हे शाखेने कुंद्रा यांच्या अर्जाला विरोध केला

Raj Kundra Pornography Case
न्याय मिळवण्यासाठी राज कुंद्राची सीबीआयकडे तक्रार   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पॉर्नग्राफी रॅकेट चालवल्याप्रकरणी राज कुंद्राला 19 जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉर्पसह अटक करण्यात आली होती.
  • एका व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने त्याच्याविरुद्ध संपूर्ण खटला रचला होता.
  • राज यांनी आपल्या तक्रारीत मुंबई क्राइम ब्रँचच्या काही अधिकार्‍यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत

Raj Kundra Pornography Case :  मुंबई :  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्रा ( Raj kundra) याने केंद्रीय तपास यंत्रणेकडे (Cerntral investigation Agency) म्हणजेच सीबीआयकडे तक्रार केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पोर्नोग्राफी (Ponography)  प्रकरणात गोवले असल्याचा दावा त्याने आपल्या तक्रारीत केला आहे. राज कुंद्राने आपल्या तक्रारीत असाही दावा केला आहे की, एका व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने त्याच्याविरुद्ध संपूर्ण खटला रचला होता. याप्रकरणात त्या व्यावसायिकाने मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला पोर्नोग्राफी रॅकेटच्या कथित खोट्या प्रकरणात अटक केली होती. (I was caught in the porn case, give me justice, CBI probe the case, Raj Kundra demanded )

अधिक वाचा  : चकमकीपूर्वी लष्करी अधिकाऱ्याचा दहशतवाद्याला Video Call

पॉर्नग्राफी प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आल्यामुळे या प्रकरणात  दाखल करण्यात आलेल्या गुन्हाची पुन्हा सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी कुंद्रा यांनी केली आहे.  
  दरम्यान, पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याप्रकरणी राज कुंद्राला 19 जुलै रोजी त्याचा सहकारी रायन थॉर्पसह अटक करण्यात आली होती.अलीकडेच राज कुंद्रा यांनी किल्ला न्यायालयात पोर्नोग्राफी प्रकरणी डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता, त्यावर गुन्हे शाखेने कुंद्रा यांच्या अर्जाला विरोध केला असून, कुंद्रा यांच्या विरोधात अनेक पुरावे असल्याचे म्हटले आहे, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबरला होणार आहे. 

अधिक वाचा  : अंधेरीत हॉटेलच्या रूममध्ये आढळला मॉडेलचा मृतदेह

या पॉर्नग्राफी प्रकरणात आपल्याला अडकविण्यात आल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशी व्हावी याची मागणी केली आहे. साबीआय चौकशीच्या मागणीसाठी कुंद्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. या तक्रार पत्रात त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावेही लिहिली आहेत, अशी माहिती  सुत्रांनी दिली आहे.  कोणत्याच पोर्नोग्राफीच्या निर्मितीशी आपला काहीही संबंध नाही किंवा त्यातून कोणताही पैसा कमावला नाही, असे राज कुंद्रा यांनी वारंवार सांगितले आहे. राजच्या म्हणण्यानुसार, हॉटशॉट अॅप त्याच्या भावजयीचे होते आणि ते अॅप अश्लील नव्हते.

अधिक वाचा  : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, रात्री उशिरा आदेश जारी

तसेच त्याच्या कंपनीने फक्त तेच सॉफ्टवेअर दिले ज्यावर ओटीटी अॅप चालू शकते. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा राज यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी 17 अॅप्सविरोधात एफआयआर दाखल केल्याचा दावाही राज यांनी केला आहे, परंतु इतर कोणालाही हायलाइट करण्यात आले नाही, पण आपल्याला बदनाम करण्यात आल्याचं कुंद्रा म्हणाले.  

अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप 

राज यांनी आपल्या तक्रारीत मुंबई क्राइम ब्रँचच्या काही अधिकार्‍यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की, या प्रकरणात दाखल केलेल्या पहिल्या 4000 पानांच्या आरोपपत्रात त्यांचे नाव नसतानाही, पोलिसांनी त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी सर्व काही केले. या खटल्यातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असेही कुंद्राने म्हटले आहे. सूत्रांनी असेही सांगितले की कुंद्राने आपल्या तक्रारीत सीबीआयला सांगितले आहे की ते साक्ष देतील अशा अनेक साक्षीदारांची माहिती शेअर करू शकतात. तक्रारीनुसार, ज्या व्यावसायिकाच्या वतीने कुंद्राला गोवण्यात आले होते, त्याचे तत्कालीन पोलिसांशी जवळचे संबंध आहेत.काही पोलिसांनी आपला काळा पैसा त्या व्यावसायिकाकडे गुंतवल्याचा आरोपही कुंद्रा यांनी केला आहे. 

कुंद्राने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, "मी एक वर्ष गप्प राहिलो आणि मीडिया ट्रायलमुळे व्यथित झालो.  इतकेच नाहीतर  मी आर्थर रोड जेलमध्ये 63 दिवस काढले आहेत. मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, जो मला मिळेल, हे मला माहीत आहे, या अधिका-यांच्या विरोधात मी चौकशीची विनंती करतो.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी