Pathan Movie Review and IMDB Rating : शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा हिंदी सिनेमा आज (बुधवार 25 जानेवारी 2023) प्रदर्शित झाला. पठाण या हिंदी सिनेमात शाहरूख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. YRF च्या स्पाय युनिव्हर्सची निर्मिती असलेल्या पठाण सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.
पठाण 50 कोटींवर ओपन करण्यासाठी सज्ज
विविध माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर अभिनेता शाहरुख खानचा पठाण पहिल्या दिवशी 50 कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 40 कोटींची कमाई केली होती.
परदेशात हेरगिरी करणारा रॉ या गुप्तचर संस्थेचा फिल्ड एजंट पठाण (शाहरूख खान) भारताच्या रक्षणासाठी बजावत असलेल्या कामगिरीची गोष्ट पठाण या हिंदी सिनेमातून दाखविली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने तयार केलेला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघणे हा एक अनोखा अनुभव आहे. सिनेमात सलमान खानचा कॅमियो अर्थात गेस्ट अपिअरन्स आहे.
अधिक वाचा : शर्टलेस होत ranbir kapoor ने फ्लॉंट केले सिक्स-पॅक अॅब्स
मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला पठाण हा सिनेमा बघणे आणि ऐकणे हा डोळे आणि कान यांच्यासाठी विलोभनीय अनुभव असल्याचे चाहत्यांनी सांगितले. ट्रेलर बघून सिनेमाचे तिकीट काढणाऱ्या अनेकांनी शाहरूखचा सिनेमा अतिशय भव्यदिव्य असल्याचे मत व्यक्त केले. पठाण सिनेमा म्हणजे थ्रिलिंग एक्सपीरिअन्स असलेला ब्लॉकबस्टर सिनेमा आहे, असेही चाहते म्हणाले.
अधिक वाचा : अन् अभिनेत्रीने सर्वांसमोर उघडली अभिनेत्याच्या पँटची चेन
पठाण या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने 4 वर्षांच्या गॅपनंतर शाहरूख खान पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकत आहे. शाहरूख आणि दीपिकाच्या अनेक चाहत्यांना पठाण हा सिनेमा सुपरडुपर हिट होईल असा विश्वास वाटत आहे.
पठाण सिनेमातील प्रमुख कलाकार : शाहरूख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा
पठाण सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक : पठाण सिनेमा हा YRF च्या स्पाय युनिव्हर्सची निर्मिती आहे. हा सिनेमा सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे.