Dharmendra Shared Video । मुंबई :सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. प्रसंगी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सुदैवाने त्यांना लगेच डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी परतले. मात्र आता धर्मेंद्र घरी परतल्यानंतर आणखीच चर्चेत आले आहेत ते त्यांच्या एका व्हिडिओमुळे. त्यांना रविवारी संध्याकाळी रूग्णालयातून घरी सोडल्यानंतर त्यांनी एक आता महत्त्वाचा मेसेज दिला आहे. (Important message given by Dharmendra after returning from the hospital, watch the video).
दरम्यान, धर्मेंद्र सिंह देओल यांनी रूग्णालयातून घरी परतल्यानंतर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रकृतीविषयी चाहत्यांना सखोल माहिती दिली आहे. मागील चार दिवसांपासून पाठदुखीने त्रस्त असलेल्या धर्मेंद्र यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, व्यायाम करताना अचानक धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
रूग्णालयातून परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, "मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. मी जे काही केले आहे त्याचा मला परिणाम सहन करावा लागला आहे. पाठीवरील एक मांसपेशी खेचली गेल्याने मला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील ४ दिवसांमध्ये मला बराच त्रास सहन करावा लागला. मात्र आता सुदैवाने तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशिर्वादांमुळे मी ठीक आहे आणि घरी परतलो आहे. त्यामुळे काही काळजी नसावी, यापुढे मी काहीच असे करणार नाही काळजी घेईन." दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.