Shehnaaz Gill googled more than Raj Kundra, Vicky Kaushal in 2021: ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 2021 वर्ष संपत आहे.विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाने प्रेक्षकांवर मोहिनी घातलीच आहे, आणि आता त्यात भर पडलीय ती शहनाज गिलची. सध्या बिग बॉस 13 फेम शहनाज गिल हेडलाइन्सवर राज्य करत आहे. 2021 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या महिला व्यक्तिमत्त्वांमध्ये ती अव्वल स्थानी आहे. शहनाज बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये दिसली तेव्हाच या दिवाने अनेकांची मने जिंकली होती आणि तेव्हापासून तिची लोकप्रियता वाढत आहे.म्युझिक व्हिडिओ, पंजाबी चित्रपट होंसला राख आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याभोवतीच्या अफवांमुळे शहनाझने २०२१ मध्ये Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या महिला व्यक्तिमत्त्वांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
बिझनेसमन राज कुंद्रा आणि अभिनेता विकी कौशल यांच्यापेक्षाही नेटकऱ्यांनी शहनाज गिलला पसंती दिली. आणि म्हणूनच गुगलवर सर्च यादीत राज कुंद्रा आणि विकी कौशललाही मागे टाकत तिने तिसरं स्थान पटकावलं आहे. राज कुंद्रा चौथ्या स्थानी तर विकी कौशल सहाव्या स्थानावर आहे.
शहनाज गिलने वर्षाच्या सुरुवातीला शारीरिक परिवर्तन घडवून आणले आणि यामुळे साऱ्यांचंच लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी ठरली.
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला असंच काहीसं झालं. मात्र, सप्टेंबरमध्ये तिने तिचा कथित प्रियकर सिद्धार्थ शुक्ला गमावला.
तर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्या म्हणजेच अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दुसऱ्या स्थानावर आहे. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणामुळे स्टार कीड आर्यन खान खूपच चर्चेत होता. त्यामुळे गुगलच्या सर्च यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
1. नीरज चोप्रा
2. आर्यन खान
3. शहनाज गिल
4. राज कुंद्रा
5. एलोन मस्क
6. विकी कौशल
7. पी.व्ही. सिंधू
8. बजरंग पुनिया
9. सुशील कुमार
10. नताशा दलाल
वरुण धवनची पत्नी नताशा दलालही सध्या चर्चेत आहे. 24 जानेवारी रोजी अलिबाग येथील मॅन्शन हाऊस रिसॉर्टमध्ये बालपणीच्या प्रेयसीशी वरूणचा विवाह झाला. कोरोनामुळे त्यांनी मोठ्या लग्नाऐवजी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले.