Pushpa 2 The Rule: पुष्पा पार्ट २ ची स्टोरी लीक! चित्रपटात या व्यक्तीकडून होणार श्रीवल्लीचा मृत्यू 

बी टाऊन
Updated Jun 21, 2022 | 14:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpa 2 The Rule Story Got Leaked । या वर्षाच्या सुरुवातीपासूनच दक्षिण भारतीय (South Movie) चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा राहिला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा: द राइज'ने हिंदी पट्ट्यातही १०० कोटींहून अधिकची कमाई केली होती.

In the second part of Pushpa The Rise, Srivalli will be killed by this person
पुष्पाच्या दुसऱ्या पार्टमध्ये ही व्यक्ती मारणार श्रीवल्लीला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुष्पा पार्ट २ ची स्टोरी लीक.
  • चित्रपटात या व्यक्तीकडून होणार श्रीवल्लीचा मृत्यू.
  • चित्रपटाच्या खलनायकाने अर्थात फहाद फासिलने श्रीवल्लीची हत्या केल्याचे वृत्त आहे.

Pushpa 2 The Rule Story Got Leaked । मुंबई : या वर्षाच्या सुरुवातीपासूनच दक्षिण भारतीय (South Movie) चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा राहिला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा: द राइज'ने हिंदी पट्ट्यातही १०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. अल्लू अर्जुनचा चित्रपटातील लूक, संवाद आणि गाण्यांची प्रेक्षकांमध्ये आजही मोठी क्रेझ आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, या चित्रपटाच्या पहिल्या पार्टनंतर आता त्याच्या दुसऱ्या पार्टची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्नाची भूमिका छोटी केल्याची माहिती आहे. (In the second part of Pushpa The Rise, Srivalli will be killed by this person). 

अधिक वाचा : धर्मवीर चित्रपटापासून बिघडले ठाकरे आणि शिंदेंचे संबंध

रश्मिका मंदान्ना यांच्या व्यक्तिरेखेबद्दल जोरदार चर्चा

दरम्यान, 'पुष्पा: द राइज' बद्दल जे माहिती समोर येत आहे त्यानुसार रश्मिका मंदान्नाचे चाहते नक्कीच निराश होतील. कारण 'पुष्पा'च्या दुसऱ्या पार्टमध्ये श्रीवल्लीचा मृत्यू दाखवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरील युजर्स पार्ट २ मधील फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या व्यक्तिरेखेबद्दल जोरदार चर्चा करत आहेत. चित्रपटाच्या खलनायकाने अर्थात फहाद फासिलने श्रीवल्लीची हत्या केल्याचे वृत्त आहे, अल्लू अर्जुनच्या पात्राला नंतर बदला घेण्यास भाग पाडते. मात्र अद्याप याविषयी निर्मात्यांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लक्षणीय बाब म्हणजे दिग्दर्शक सुकुमार यांचा हा चित्रपट पुढील महिन्याच्या जुलै अखेरीस समोर येईल. यापूर्वी जुलैच्या सुरुवातीला शूटींग होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 'पुष्पा'चा पहिला भाग हिट झाल्यानंतर दुसऱ्या भागासाठी निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. त्यामुळेही चित्रपटाच्या फ्लोरवर जाण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. 

प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरता 

आरआरआर आणि केजीएफ चॅप्टरने पुष्पासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे निर्मात्यांना कोणत्याही परिस्थितीत चित्रपट सुपर बनवायचा आहे. जेणेकरून तो बॉक्स ऑफिसवर दक्षिण भारतीय चित्रपटांचे यश कायम ठेवू शकेल. प्रेक्षकही आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी