बॉलिवूडचे हरिश पटेल हॉलिवूडच्या सुपरहिरो सिनेमात

हॉलिवूडचा मार्वल फिल्म स्टुडिओ हा सुपरहिरोंच्या सिनेमांची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मार्वल स्टुडिओच्या इटर्नल्स या सिनेमात बॉलिवूडचे अभिनेते हरिश पटेल दिसणार

Indian actor Harish Patel in upcoming Marvel film ‘Eternals’
बॉलिवूडचे हरिश पटेल हॉलिवूडच्या सुपरहिरो सिनेमात 

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूडचे हरिश पटेल हॉलिवूडच्या सुपरहिरो सिनेमात
  • मार्वल स्टुडिओच्या इटर्नल्स सिनेमात
  • हरिश पटेल हे ६७ वर्षांचे आहेत

मुंबईः हॉलिवूडचा (Hollywood) मार्वल फिल्म स्टुडिओ (Marvel film) हा सुपरहिरोंच्या सिनेमांची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मार्वल स्टुडिओच्या इटर्नल्स (Eternals) या सिनेमात बॉलिवूडचे (Bollywood) अभिनेते हरिश पटेल (Harish Patel) दिसणार आहेत. Indian actor Harish Patel in upcoming Marvel film ‘Eternals’

मार्वल फिल्म स्टुडिओने इटर्नल्स या सिनेमाचा टीझर लाँच केला. यात हॉलिवूडच्या कुमैल नानजियानी (Kumail Nanjiani) यांच्या शेजारी बॉलिवूडचे हरिश पटेल दिसत आहेत. स्वतः हरिश पटेल यांनी मार्वल स्टुडिओच्या इटर्नल्स सिनेमात दिसणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण मार्वल फिल्म स्टुडिओने सिनेमातील सहकलकारांपैकी अनेकांची नावं अद्याप जाहीर केलेली नाही. हरिश पटेल यांचेही नाव जाहीर झालेले नाही. याच कारणामुळे या विषयावर आणखी भाष्य करणे शक्य नसल्याचे हरिश पटेल म्हणाले.

हरिश पटेल हे ६७ वर्षांचे आहेत. त्यांनी भारतीय नाट्यसृष्टीत तसेच अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी बॉलिवूडच्या मंडी, गुंडा, मिस्टर इंडिया, अंदाज अपना अपना, झुबैदा या सिनेमात अभिनय केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झालेल्या रन फॅटबॉय रन, कोरोनेशन स्ट्रीट, द बुद्धा ऑफ सर्बिया यातही त्यांनी अभिनय केला आहे.

मार्वल स्टुडिओच्या इटर्नल्स सिनेमाचे दिग्दर्शन ऑस्करविजेते दिग्दर्शक क्लो झाओ यांनी केले आहे. या सिनेमात अँजेलिना जोली प्रमुख भूमिकेत आहे. सलमा हायेक, किट हरिंगटन, रिचर्ड मॅडेन हे पण या सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाची कथा पृथ्वीवर येऊन गुप्तपणे राहणाऱ्या परग्रहवासींवर बेतलेली आहे. हा सिनेमा भारतात दिवाळीच्या सुमारास तर अमेरिकेत ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. हॉलिवूडचा सिनेमा आधी भारतात आणि नंतर इतरत्र प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना संकटाच्या स्थितीचा आढावा घेऊन सिनेमा प्रदर्शनाच्या नियोजनात बदल करायचा की नाही याचा निर्णय योग्यवेळी घेण्याचे संकेत निर्मात्यांनी दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी