Grammy 2022: संगीतकार रिकी केजने भारतीयांसाठी दिली खुशखबर; 'डिव्हाईन टाइड्स'साठी मिळाले नामांकन

बी टाऊन
Updated Apr 04, 2022 | 10:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ricky Cage । सध्या संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्डची सर्वत्र चर्चा रंगली आहे. लक्षणीय बाब म्हणजे यावेळी भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नामांकन देखील समोर आले. भारतीय संगीतकार रिकी केज यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' या अल्बमसाठी ६४ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले आहे.

Indian musician Ricky Cage has been nominated for a Grammy Award 2022
संगीतकार रिकी केजने भारतीयांसाठी दिली खुशखबर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्डची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
  • संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार 'ग्रॅमी अवॉर्ड्स २०२२' ची सुरूवात झाली आहे.
  • यावेळी भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नामांकन देखील समोर आले आहे.

Ricky Cage । नवी दिल्ली : सध्या संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्डची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतीच संगीत उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार 'ग्रॅमी अवॉर्ड्स २०२२' ची (Grammy 2022) सुरूवात झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे यावेळी भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नामांकन देखील समोर आले. भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांना त्यांच्या 'डिव्हाईन टाइड्स' (Divine Tides) या अल्बमसाठी ६४ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले आहे. (Indian musician Ricky Cage has been nominated for a Grammy Award 2022). 

अधिक वाचा : ST Workers Strike : BMC समोर एसटी कर्मचाऱ्यांचा बोंबाबोंब

महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिकी केजने यापूर्वी देखील ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. ज्या अल्बमसाठी रिकीला नामांकन देण्यात आले आहे, तो त्यांना ब्रिटीश रॉक ग्रुप 'द पोलीस' च्या संस्थापक आणि ड्रमरने रॉक-लिजेंड स्टीवर्ट स्टीवर्ट कोपलँडसह तयार केला आहे. तसेच या अल्बमचे दिग्दर्शक देखील एक भारतीय आहे. 

अधिक वाचा : Petrol, Diesel Price Today : दोन आठवड्यात 12वी दरवाढ

दरम्यान, ६४ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार संगीत उद्योगातील मोठ्या दिग्गजांना दिला जाईल. मात्र या यादीत एका भारतीयाच्या नावामुळे भारताच्या खात्यात ग्रॅमी अवॉर्ड येण्याच्या आशाही वाढली आहे. रिकी केजने यापूर्वी २०१५ मध्येही हा पुरस्कार जिंकला आहे. 'विंड्स ऑफ संसार' या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. एवढेच नाही तर त्या वेळी यूएस बिलबोर्ड न्यू एज अल्बम चार्टवरही या अल्बमने पहिले स्थान पटकावले होते. लक्षणीय बाब म्हणजे या चार्टवर पदार्पण करणारे रिकी पहिले भारतीय ठरले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ricky Kej (@rickykej)

तसेच रिकी केजच्या नावावर सर्वात तरूण भारतीय म्हणून ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे. रिकी यांच्याशिवाय ३ आणखी भारतीयांनीही हा पुरस्कार जिंकला आहे. यामध्ये एआर रहमान, रविशंकर, झाकीर हुसेन यांच्या नावांचा समावेश आहे. गॅमी पुरस्कारासाठी पुन्हा एकदा नामांकन मिळाल्याबद्दल रिकी यांनी म्हटले की, 'डिव्हाईन टाइड्स' साठी दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझे संगीत क्रॉस कल्चर असेल, पण त्याची मुळे ही नेहमीच भारताशी जोडलेली आहेत. हे नामांकन मला माझा संगीत प्रवास सुरू ठेवण्यासाठी अधिक प्रोत्साहित करते. यासाठी माझ्या सहकार्यांचा आणि रेकॉर्डिंग अकादमीचा खूप आभारी आहे." 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी