इंदिरा गांधींनी खलिस्तानींना मच्छरासारखं चिरडलं, कंगनावर भडकली अकाली दल

बी टाऊन
भरत जाधव
Updated Nov 21, 2021 | 13:35 IST

वादग्रस्त विधानासाठी ओळखली जाणारी कंगना राणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल विधान ताजे असतानाच तिने खलिस्तानींविषयी विधान केलं आहे. केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाचा पारा चांगलाच चढला असून ती सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक पोस्ट शेअर करत आहे.

Indira Gandhi crushed the Khalistanis like a mosquito the Akali Dal erupted
कंगनावर भडकली अकाली दल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कंगना राणौतचं खलिस्तानींवर वादग्रस्त विधान
  • कृषी कायदे रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर कंगनाने व्यक्त केला राग
  • कंगनाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल

मुंबई : वादग्रस्त विधानासाठी ओळखली जाणारी कंगना राणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल विधान ताजे असतानाच तिने खलिस्तानींविषयी विधान केलं आहे. केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाचा पारा चांगलाच चढला असून ती सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक पोस्ट शेअर करत आहे. आता यासर्व प्रकरणात कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
इंदिरा गांधींनी खलिस्तानींना मच्छरासारखं चिरडलं असेही कंगनाने आपल्याला पोस्टमध्ये म्हटले आहे. कंगनाच्या विधानाने अकाली दल भडकले आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. इंस्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कंगना विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. समितीने जारी केलेल्या निवेदनानुसार, कंगनाच्या विरोधात ही तक्रार मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात सायबर सेलमध्ये नोंदवण्यात आली आहे.

कमिटीच्या लोकांचे म्हणणे आहे की, कंगनाने सर्वप्रथम शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन असे जाणीवपूर्वक म्हटले होते आणि त्यानंतर तिने शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने म्हटले आहे की, “शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या गुन्हेगारी हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार करण्यात आली होती आणि ती शेअर करण्यात आली होती.

कृषी कायद्यावर कंगनाचं विधान 

कृषीविषयक तीनही कायदे मागे घेतल्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने लिहिले होते की, ‘दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचे… संसदेत बसलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर तेही जिहादी आहे. हा देश आहे… ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन.’ कंगनाने आनंद रंगनाथन यांचे ट्विट तिच्या स्टोरीवर शेअर केले होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी