हा आहे का तैमूर अली खानचा छोटा भाऊ? आजोबा रणधीर कपूरने चुकून शेअर केला फोटो

बी टाऊन
Updated Apr 06, 2021 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kareena Kapoor second baby: करीना कपूरचे वडील रणधीर कपूरने तैमूरसोबत एका मुलाचा फोटो शेअर केला आहे. यानंतर अशी चर्चा होतेय की हा तैमूरचा छोटा भाऊ आहे. 

taimur
हा आहे का तैमूर अली खानचा छोटा भाऊ? आजोबांनी शेअर केला फोटो 

थोडं पण कामाचं

  • करीना कपूरच्या छोट्या भावाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत
  • करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी तैमूरसोबत एका मुलाचा फोटो शेअर केला आहे
  • फोटो पाहून अशी चर्चा होतेय की हा तैमूर अली खानचा छोटा भाऊ आहे. 

मुंबई: करीना कपूरने(kareena kapoor) फेब्रुवारीमध्ये आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. करीना कपूरने आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या(international womens day) निमित्ताने मुलाची पहिली झलक शेअर केली होती. आता करीनाचे वडील रणधीर कपूरने(randhir kapoor) तैमूरसोबत(taimur) एका मुलाचा फोटो शेअर केला आहे. यानंतर अशी चर्चा सुरू होती की हा तैमूरचा लहान भाऊ आहे. 

रणधीर कपूरने इन्स्टाग्रामवर दोन फोटोंचे एक कोलाज शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये तैमूर होता तर दुसऱ्या फोटोत तैमूरसारखा दिसणारा एक लहान बाळ होता. रणधीर कपूर यांनी शेअर केलेल्या या फोटोनंतर हा तैमूरचा छोटा भाऊ असल्याची चर्चा जोरदार सुरू होती. दरम्यान, रणधीर कपूर यांच्या अकाऊंटला ब्लू टिक नाही आहे मात्र कपूर कुटुंबातील अनेक सदस्य याला फॉलो करतात. 

फोटो केला डिलीट

रणधीर कपूरने काही वेळानंतर फोटो डिलीट केला होता. करीना कपूरने आतापर्यंत आपल्या लहान बाळाचा फोटो दाखवलेला नाही. तसेच त्याच्या नावाचाही खुलासा करण्यात आलेला नाही. रणधीर कपूर यांनी याआधी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा आपल्या भावाशी म्हणजेच तैमूरशी मिळताजुळता आहे. ते पुढे म्हणाले, मला सगळीच मुले एकसारखी दिसतात. 

Dabboo kapoor

महिला दिवस निमित्ताने शेअर केला होता फोटो

करीना कपूरने ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुलाची पहिली झलक शेअर केली होती. फोटोत करीनाने आपल्या लाडक्याला कुशीत घेतले होते. यासोबतच तिने या पोस्टला चांगली कॅप्शन दिली होती. करीना कपूरने फोटोसोबत लिहिले होते, असे काही नाही जे महिला करू शकत नाहीत. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी