शाहिदच्या 'इश्क विश्क' च्या सिक्वलमध्ये ईशान खट्टर? 

बी टाऊन
Updated Jun 25, 2019 | 23:52 IST

शाहिद कपूरचा डेब्यू  इश्क विश्क सिनेमाचा १७ वर्षानंतर सिक्वल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता चर्चा आहे की, या सिनेमात शाहिदचा छोटा भाऊ ईशान खट्टर लीड रोल प्ले करण्याची शक्यता आहे. 

Shahid Kapoor, Ishaan Khatter
शाहिदच्या 'इश्क विश्क' च्या सिक्वलमध्ये ईशान खट्टर?   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः  बॉलिवूडचा चार्मिंग एक्टर शाहिद कपूर सध्या कबीर सिंग या सिनेमामुळे हेडलाईनमध्ये आहे. सिनेमा हिट ठरल्यानंतर शाहिद सध्या सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. कबीर सिंग या सिनेमात शाहिद भलेही बियर्ड लूकमध्ये खूप इन्टेंस दिसत असेल. तरी सुद्धा शाहिदनं आपल्या करिअरची सुरूवात चॉकलेट बॉयच्या रूपानं सिनेमा इश्क विश्कमधूनच केली होती. या सिनेमाची कथा कॉलेज रोमान्सवर बेस्ट होती. काही वेळापूर्वी इश्क विश्क सिनेमाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा होती. आता अशी चर्चा रंगत आहे की, या सिनेमाच्या सिक्वलमध्ये शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खट्टर दिसण्याची शक्यता आहे. 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, इश्क विश्कसाठी ईशानचा लीड रोलसाठी विचार सुरू आहे. पिंकविलानं एका सुत्राच्या माहितीवरून सांगितलं की, ईशानसोबत सुरूवातीच्या आयडियावर चर्चा केली आहे. मात्र आतापर्यंत काही अंतिम निर्णय घेतला गेला नाही आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, निर्माते सध्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. इश्क विश्क यंगस्टरवर आधारित आहे. त्यासाठी ईशान खट्टर पेक्षा अजून कोण असूच शकत नाही. ज्यात या रोलसाठी तसाच चार्म आणि भोळसटपणा असावा. सिनेमाची आयडिया ईशानसोबत शेअर केली आहे. मात्र अजूनही काही फायनल गोष्टी झालेल्या नाही आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wood fire

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

हा सिनेमा रमेश तौरानी डायरेक्ट करण्याची शक्यता असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. आतापर्यंत यावर त्यांनी काही कमेंट केली नाही आहे. १७ वर्षांनंतर इश्क विश्कच्या सिक्वलबद्दल  आताही फॅन्समध्ये खूप उत्साह आहे. या सिनेमात शाहिदच्या अपोझिट अमृता राव दिसली होती. कॉलेज लाइफवर आधारित हा सिनेमा यंग जनरेशनच्या खूप पसंतीस उतरला होता. हा सिनेमा येताच शाहिद कपूर एक क्यूट एक्टर या रूपानं ओळखू लागला. आता जर का ईशान शाहिदच्या इश्क विश्कच्या सिक्वलमध्ये दिसला तर फॅन्ससाठी ही खूप आनंदाची बातमी असेल. पण आतापर्यंत याबाबतीत कोणतीही अधिकृत स्पष्टता झालेली नाही आहे. 

ईशान खट्टर बोलायचं झाल्यास, ईशाननं आपल्या करिअरची सुरूवात माजिद मजिदी यांचा सिनेमा बियॉन्ड द क्लाउड्स यापासून केली होती. त्यानंतर ईशान शशांक खेतानचा सिनेमा धडंकमध्ये दिसला होता. हा सिनेमा मराठी सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक होता. धडक या सिनेमातून ईशानसोबतच जान्हवी कपूरनं सुद्धा डेब्यू केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शाहिदच्या 'इश्क विश्क' च्या सिक्वलमध्ये ईशान खट्टर?  Description: शाहिद कपूरचा डेब्यू  इश्क विश्क सिनेमाचा १७ वर्षानंतर सिक्वल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता चर्चा आहे की, या सिनेमात शाहिदचा छोटा भाऊ ईशान खट्टर लीड रोल प्ले करण्याची शक्यता आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles