मुंबई : बॉलिवुडमध्ये दिग्दर्शनातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे मधूर भांडारकर. रसिक 'चांदनी बार', 'पेज 3', 'फॅशन', असे अनेक लोकप्रिय चित्रपट देत त्यांनी रसिकांच्या मनात ठसा उमटवला आहे. भांडारकर सोशल मीडियावरही सक्रीय असतात. त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. यात त्यांनी चाहत्यांसोबत एक गुड न्युज शेअर केली आहे. ही न्यूज आहे त्यांचा आगामी चित्रपट बबली बाऊंसरबाबतची. (It's a rap! Saying this, Madhur Bhandarkar shared the good news)
भांडारकर यांनी सोशल मीडिया अॅप 'कू'वर एका खास व्हिडिओसह पोस्ट शेअर करत म्हटले आहे, "सलग 3 महिने 42 दिवस. आता शुटिंग संपलं आहे. या काळातल्या आठवणी खूपच खास आहेत. माझे सगळे कलावंत, तंत्रज्ञ आणि ज्या सगळ्यांनी सुरवातीपासून शेवटपर्यंत भक्कम साथ दिली त्या सगळ्यांचे खूप आभार.
भांडारकर यांनी पोस्ट केलेल्या फोटोत ते तमन्ना भाटियासह क्लॅपबोर्ड धरून आनंदात पोज देताना दिसत आहेत. सगळ्या टीमने शुटिंग यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद केक कापून साजरा केला. तमन्ना भाटियाची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन मधूर भांडारकर यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि जंगली पिक्चर्सची ही निर्मिती आहे.
या सिनेमात तमन्ना भाटियासह अभिषेक बजाज, साहिल वैद आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका आहेत. सिनेमा हिंदीसह तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.