जॅकी अन् रकुल एकमेंकांच्या प्रेमात: रकुल म्हणते नव्या आठवणी बनवायच्या आहेत; तर जॅकी म्हणतो तुझ्याशिवाय जेवणाला नाही चव

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 10, 2021 | 16:47 IST

अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आज 10 ऑक्टोबरला 31 वर्षाची झाली असून ती आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Jackie Bhagnani and Anarkul Preet Singh's love
जॅकी अन् रकुल एकमेंकांच्या प्रेमात, वाढदिवशीच केला खुलासा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आज 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.
  • रकुलप्रीत सिंहचे चाहते सोशल मीडियावर भरभरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
  • रकुलप्रीतने आपल्या वाढदिवस जॅकी भगनानी सोबतच्या नात्याविषयी खुलासा केला

मुंबई : अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आज 10 ऑक्टोबरला 31 वर्षाची झाली असून ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. रकुलप्रीत सिंहचे चाहते सोशल मीडियावर भरभरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रकूल प्रीत सिंह यांचा हा वाढदिवस खूप महत्त्वाचा आणि आठवणीत राहणारा ठरला आहे. कारण रकूल प्रीत सिंहने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर जॅकी भगनानीबरोबर असलेल्या संबंधांविषयी खुलासा केला आहे.

दोघांचा फोटो शेअर करत अधिकृतपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली असून ते एकमेंकांना डेट करत असल्यास रकुलने सांगितले आहे. डॅग्स प्रकरणात नाव आल्यानंतर चर्चेत आलेली रकुल आता परत चाहत्यांच्या चर्चेत कायम असणार आहे. दरम्यान ती आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यादिवशी तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीत सिंहने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपट निर्माते जॅकी भगनानी यांच्याशी तिच्या नात्याची पुष्टी केली आहे. रकुलप्रीतने त्यांच्या नात्याची घोषणा करून चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले आहे कारण त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. एवढेच नाही तर रकुल प्रीत सिंगने तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसाठी एक गोड नोटही लिहिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीत सिंगने लिहिले- 'धन्यवाद माझ्या हृदया, तू या वर्षी माझी सर्वात मोठी भेट आहेस. माझ्या आयुष्यात रंग भरल्याबद्दल धन्यवाद, मला न थांबता हसवल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही जसे आहात त्याबद्दल धन्यवाद. एकत्रितपणे आपल्याला आणखी आठवणी बनवायच्या आहेत जॅकी भगनानी. रकुलप्रीत सिंगच्या या पोस्टनंतर त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांकडून अभिनंदनाचा ओघ वाढला आहे.
 

जॅकी भगनानीनेही व्यक्त केले आपले प्रेम 

तेच चित्र शेअर करताना जॅकी भगनानी लिहिले, "तुझ्याशिवाय दिवस एक दिवसासारखा वाटत नाही, तुझ्याशिवाय स्वादिष्ट अन्नाची चवही लागत नाही." माझ्यासाठी माझे जग असलेल्या सर्वात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे. देवाला प्रार्थना करतो की, हा दिवस तितकाच सुंदर राहावा जितकी सुंदर तुझं हसणं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी रकुलप्रीत.'


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी