...म्हणून राजभवनात लपून यायचा जॅकी श्रॉफ

Jackie Shroff revealed secrets : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ याने एक मोठा गौप्यस्फोट केला. राजभवन परिसरात लपूनछपून यायचो असे जॅकी श्रॉफ म्हणाला. 

Jackie Shroff revealed secrets
...म्हणून राजभवनात लपून यायचा जॅकी श्रॉफ 
थोडं पण कामाचं
  • ...म्हणून राजभवनात लपून यायचा जॅकी श्रॉफ
  • बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ याने मोठा गौप्यस्फोट केला
  • जॅकी श्रॉफने सांगितल्या 'त्या' आठवणी, दिली मोठी कबुली

Jackie Shroff revealed secrets : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ याने एक मोठा गौप्यस्फोट केला. राजभवन परिसरात लपूनछपून यायचो असे जॅकी श्रॉफ म्हणाला. 

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

तीन बत्ती नावाचा परिसर मुंबईत राजभवनाच्या जवळ आहे. या परिसरात एका चाळीत बालपण गेल्याचे जॅकी श्रॉफने सांगितले. बालपणी क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांसोबत राजभवनातील मोकळ्या परिसरात जायचो. खेळण्याकरिता राजभवन परिसरात लपूनछपून जायचो असे जॅकी श्रॉफी म्हणाला. तो राजभवन येथे एका कार्यक्रमात बोलत होता. 

वापरा या डाएट टिप्स आणि 7 दिवसात व्हा स्लिम फिट

जॅकी श्रॉफ म्हणाला तो वास्तव्यास होता त्या चाळीत सात खोल्या आणि तीन टॉयलेट होती. मॉडेलिंग आणि सिनेमाची कामं करायला सुरुवात केल्यावर चाळ मालकाने तीन पैकी एका टॉयलेटची चावी माझ्याकडे दिली. यामुळे टॉयलेटसाठी रांग लावण्याची गरज संपली. साधी गोष्ट त्याकाळात मोठा बहुमान वाटला होता, असे जॅकी श्रॉफने प्रांजळपणे सांगितले. 

राजभवनाच्या जनसंपर्क शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या 'राजभवनचा समुद्र किनारा' या माहितीपटाचे प्रदर्शन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी त्यावेळचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवनातील भूमिगत बंकर प्रकाशात आणले. आज त्या ठिकाणी क्रांतिकारकांचे दालन उभारण्यात आले असून पंतप्रधांनी देखील त्याला भेट देऊन त्याचे कौतुक केले असे राज्यपालांनी सांगितले. या परिसराचा विस्तृत इतिहास समाजापुढे आणल्यास राजभवन हे प्रेरणाकेंद्र होईल, असेही राज्यपाल म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी