बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पासपोर्ट जप्त

Jacqueline Fernandez passport has been seized by ED as she seeks permission to travel for IIFA 2022 : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचा पासपोर्ट ईडीने जप्त केला आहे. ईडीने २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग (आर्थिक अफरातफर) प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Jacqueline Fernandez passport has been seized by ED as she seeks permission to travel for IIFA 2022
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पासपोर्ट जप्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पासपोर्ट जप्त
  • ईडीने आधी पीएमएलए कायद्यांतर्गत जॅकलिनची सात कोटींची संपत्ती जप्त केली आहे
  • जॅकलिनने विदेशात जाण्यासाठी कोर्टात केला अर्ज

Jacqueline Fernandez passport has been seized by ED as she seeks permission to travel for IIFA 2022 : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचा पासपोर्ट ईडीने जप्त केला आहे. ईडीने २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग (आर्थिक अफरातफर) प्रकरणी तपास सुरू केला आहे. या तपासकामाचा एक भाग म्हणून जॅकलिनचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखरसोबत लागेबांधे असल्यामुळे जॅकलिनच्या अडचणी वाढल्या आहेत. 

ईडीने आधी पीएमएलए कायद्यांतर्गत जॅकलिनची सात कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या जप्ती पाठोपाठ आता जॅललिनचा पासपोर्ट पण जप्त करण्यात आला आहे.

जॅकलिनने काही दिवसांपूर्वीच कोर्टात एक अर्ज दिला आहे. आयफा पुरस्कार सोहळा २०२२ साठी अबुधाबी येथे जाण्याची तसेच फिरण्याकरिता नेपाळ आणि फ्रान्सला जाण्याची परवानगी मिळावी असा अर्ज जॅकलिनने केला होता. या अर्जावर निर्णय येण्याआधीच जॅकलिनचा पासपोर्ट ईडीने जप्त केला आहे.

जॅकलिनच्या कोर्टात सादर केलेल्या अर्जावर १८ मे २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. पण जॅकलिन देशाबाहेर जाऊ नये म्हणून ईडीने देशभर दिसताक्षणी अटक करा असा आदेश देणारी लूकआऊट नोटीस काढली आहे.

काय आहे प्रकरण ?

सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. तसेच जॅकलिनच्या बहिणीला दीड लाख अमेरिकन डॉलरचे कर्ज दिले आहे. जॅकलिनचा भाऊ वॉरेन याला १५ लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. जॅकलिनला एक महागडा घोडा भेट म्हणून दिला आहे. या पूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी