Jacqueline Fernandez Video: महागड्या प्रेम गिफ्टमुळे ईडी जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीला आठवला देव, दोष मुक्तीसाठी जॅकलिननं गाठलं मंदिर

बी टाऊन
भरत जाधव
Updated Aug 23, 2022 | 09:55 IST

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (actress) जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या अंमलबजावणी संचालनालयाची (Enforcement Directorate) (ईडी) कारवाईमुळे चर्चेत आली आहे. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरमुळे (Sukesh Chandrasekhar) ईडीच्या चौकशी फेऱ्यात अडकलेल्या जॅकलिनला आता देवच वाचवू शकतो अशी प्रचिती स्वत:अभिनेत्रीला आली काय असं वाटू लागलं आहे. 

Jacqueline Fernandez Visit Temple
ईडीची पीडा दूर होण्यासाठी जॅकलिन देवाच्या दारी   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री जॅकलिनला मुंबईच्या एका मंदिरात पाहण्यात आले आहे.
  • व्हिडिओमध्ये जॅकलिन निळ्या रंगाच्या साध्या सूटमध्ये दिसत आहे.
  • सुकेश चंद्रशेखरला ताब्यात घेतल्यानंतर जॅकलिन वादात सापडली.

Jacqueline Fernandez Temple Visit: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (actress) जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या अंमलबजावणी संचालनालयाची (Enforcement Directorate) (ईडी) कारवाईमुळे चर्चेत आली आहे. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरमुळे (Sukesh Chandrasekhar) ईडीच्या चौकशी फेऱ्यात अडकलेल्या जॅकलिनला आता देवच वाचवू शकतो अशी प्रचिती स्वत:अभिनेत्रीला आली काय असं वाटू लागलं आहे. 

कारण काही दिवसांपूर्वीच ईडीने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणाशी संबंधित आरोपपत्रात तिला आरोपी करण्यात आले, अशात अभिनेत्री जॅकलिनला मुंबईच्या एका मंदिरात पाहण्यात आले आहे. जिथून तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी बनवल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस सोमवारी मुंबईतील जुहू येथील मुक्तेश्वर मंदिरात जाताना दिसली. 

Read Also : गणेशोत्सवासाचा आनंद वाढवणार एसटी महामंडळ

जॅकलिनचा साधा लुक

अभिनेत्री जॅकलिनने ग्लॅमरपासून दूर ठेवत अगदी साध्या स्टाईलमध्ये मंदिरात आली होती. व्हिडिओमध्ये जॅकलिन निळ्या रंगाच्या साध्या सूटमध्ये दिसत आहे, तिच्या कपाळावर टिळा लावलेला आहे. आणि देवाचे दर्शन करून ती मंदिरातून बाहेर पडत आहे. जॅकलिनचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अनेक यूजर्सनी अभिनेत्रीच्या साध्या लूकचे कौतुक केले आहे.

अनेकवेळा चौकशी केली

मात्र, यावेळी जॅकलिननेही चेहऱ्यावर मास्क लावला होता. 200 कोटींहून अधिक रकमेच्या खंडणीच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरला ताब्यात घेतल्यानंतर जॅकलिन वादात सापडली होती. या प्रकरणी जॅकलिनची यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे.

Read Also :भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे 5 डब्बे रुळावरुन घसरले

जॅकलीनशी प्रेमसंबंध

या ठग सुकेश जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही त्याने केला होता, मात्र जॅकलिनने याला नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात, ईडीने या प्रकरणात जॅकलिनला आरोपी बनवल्यानंतर, तिच्या वकिलाने एका निवेदनात सांगितले की, जॅकलिनला अद्याप तक्रारीची अधिकृत प्रत मिळालेली नाही.

ETimes च्या रिपोर्टमध्ये जॅकलिनच्या वकिलाचा हवाला देऊन लिहिलं आहे- 'अंमलबजावणी संचलनालयाकडून तक्रार करण्यात आल्याची माहिती फक्त मीडिया रिपोर्ट्सद्वारे मिळाली आहे. अंमलबजावणी संचालनालय किंवा माननीय न्यायालयाकडून कोणताही अधिकृत संवाद झालेला नाही. माझ्या क्लायंटला अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या तक्रारीची कोणतीही प्रत मिळालेली नाही. तथापि, जर मीडिया रिपोर्ट्स खरे असतील, तर माझ्या क्लायंटला या प्रकरणात आरोपी म्हणून सादर करण्यात आले आहे हे दुर्दैवी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी