Janhvi Kapoor Wedding: जान्हवी कपूर तिच्या लग्नात नेसणार कांजीवरम झरीची साडी

बी टाऊन
Updated Sep 11, 2019 | 14:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रत्येकजण कधीतरी आपल्या लग्नाची स्वप्न पाहतच असतो. त्यातही मुलींचं आपल्या लग्नाबद्दल एक वेगळंच विश्व आपल्या डोक्यात तयार झालेलं असतं. अशीच गोष्ट आहे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लग्नाची. वाचा सविस्तर.

jahnvi kapoor talks about her dream wedding says will wear a kanjeevaram silk sari
Janhvi Kapoor Wedding: जान्हवी कपूर तिरुपथीला होणाऱ्या तिच्या लग्नात नेसणार कांजीवरम झरीची साडी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जान्हवी कपूरने सांगीतली तिच्या लग्नाची गोष्ट
  • ब्रायडल कव्हर पिकवर झळकलेली जान्हवी म्हणते तिरुपतीला करणार लग्न, नेसणार कांजीवरम साडी
  • जान्हवीने जोडीदाराबद्दल देखील सांगीतल्या अपेक्षा

मुंबई: प्रत्येक मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस फार खास असतो. तो दिवस उजाडण्याच्या आधीच तिने त्या दिवसाची अनेक स्वप्न पाहिलेली असतात. आपली साडी कशी असेल, लूक काय असेल, शिवाय कोणत्या पद्धतीत आणि कुठे आपलं लग्न होणार हे आणि अशा अनेक गोष्टी आपल्या लग्नाच्या बाबतीत डोक्यात तयार केलेल्या असतात. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर काही वेगळी नाही आहे. तिने सुद्धा तिच्या लग्नाबद्दल अशीच काही स्वप्न पाहिली आहेत. नुकतीच तिनं सांगितली तिच्या लग्नाची गोष्ट.

ब्राईड्स टुडे, या प्रसिद्ध ब्रायडल मॅगझिनच्या सप्टेंबरच्या मुखपृष्ठावर जान्हवी झळकली आहे. या कव्हर पेजमध्ये एका मॉर्डन ब्रायडल लूकमध्ये जान्हवी कमालिची सुंदर दिसत होती. यावेळी जान्हवी स्वतःच्या लग्नाबद्दल भरभरुन बोलली आणि त्याबद्दल अनेक खुलासे सुद्धा केले. जान्हवीला तिचं लग्न तिरुपतीला व्हावं असं वाटतं. या शिवाय या मॅगझिनशी लग्नाबाबत अधिक बोलताना ती म्हणाली, “मला फार साधं आणि थोडक्यात पण अगदी खरेपणानं लग्न करायचं आहे. मला काहीही भव्य-दिव्य नको आहे. मला कुठेतरी हे आधीच माहिती आहे की माझं लग्न फार पारंपारिक पद्धतीत तिरुपतीला पार पडणार आहे. मी छान कांजीवरम झरीची साडी नेसणार आहे आणि मोठी मेजवानी असणार आहे लग्नानंतर, ज्यामध्ये मस्त साऊथ इंडियन जेवण असेल. मला इडली, सांबार, दही भात आणि खीर खूप आवडते”

 

 

लग्नाबद्दल बोलताना जान्हवीने तिला अपेक्षित जोडीदाराबद्दल पण आपलं मत व्यक्त केलं. तिला तिचा होणारा नवरा हुशार आणि कर्तबगार तर हवाच आहे शिवाय ती म्हणते की तिला त्याच्यासोबत असताना तिला छान वाटायला हवं आणि त्याकडून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. तसंच त्याचा सेन्स ऑफ ह्युमर पण चांगला असायला हवा.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

जान्हवी कपूरने लग्नाबाबातची तिच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या असल्या तरी जान्हवीच्या लग्नाला अद्यापतरी खूप वेळ आहे. पण जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा हाच सगळा थाट असेल असं वाटतं आहे. या ब्रायडल कव्हरवर झळकल्यानंतर जान्हवी लवकरच गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमात गुंजन सक्सेनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. गुंजन ही पहिली महिला भारतीय एअर फोर्स पायलट होती आणि ती पहिली एअर फोर्स महिला पायलेट ठरली जी एका मिशनमध्ये सहभागी झाली. शरन शर्मा हा नवोदीत दिग्दर्शक हा सिनेमा दिग्दर्शित करत असून सिनेमात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार सिंग आणि मानव विज यांच्या पण महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे १३ मार्च २०२०मध्ये भेटीला येणार आहे. त्याशिवाय जान्हवी राज कुमार रावच्या अपोझिट रुहीआफ्झा या सिनेमात सुद्धा झळकणार आहे. या कॉमेडी हॉरर सिनेमात जान्हवीचा डबल रोल असणार आहे. तशीच जान्हवी लवकरच करण जोहरच्या तख्त या मल्टी स्टारर सिनेमात ही दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Janhvi Kapoor Wedding: जान्हवी कपूर तिच्या लग्नात नेसणार कांजीवरम झरीची साडी Description: प्रत्येकजण कधीतरी आपल्या लग्नाची स्वप्न पाहतच असतो. त्यातही मुलींचं आपल्या लग्नाबद्दल एक वेगळंच विश्व आपल्या डोक्यात तयार झालेलं असतं. अशीच गोष्ट आहे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लग्नाची. वाचा सविस्तर.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय