Janhvi kapoor trolled: जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली 

Janhvi kapoor trolled । जान्हवी कपूरने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या चित्रपटांसोबतच ती तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. कधीकधी अभिनेत्रीला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी खूप प्रशंसा मिळते, तर काहीवेळा तिला यासाठी ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागतो.

Janhvi Kapoor once again trolled because of her dress
जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे ट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जान्हवी कपूरने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
  • जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
  • जान्हवी कपूर बॉम्बे गर्ल, गुड लक जेरी आणि बावल या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Janhvi kapoor trolled । मुंबई : जान्हवी कपूरने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. कधीकधी अभिनेत्रीला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी खूप प्रशंसा मिळते, तर काहीवेळा तिला यासाठी ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागतो. दरम्यान जान्हवी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. जान्हवी काल रात्री मुंबईत तिच्या काही मित्रांसोबत एका फूड आउटलेटवर डिनर करण्यासाठी आली होती. यादरम्यान ती कारमधून खाली उतरली आणि थेट रेस्टॉरंटमध्ये गेली. प्रवेश करताना तिने काही पोजही दिल्या. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (Janhvi Kapoor once again trolled because of her dress). 

अधिक वाचा : ड्रेसिंग रूममध्ये गरम झालेल्या वेडला BCCI ने केले गार

जान्हवी कपूर ट्रोल

जान्हवी कपूर तिच्या मैत्रिणींसोबत डिनर करायला आली होती. यादरम्यान ती तिच्या लूकमध्ये खूप आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जान्हवीने तिच्या लूकमध्ये सुंदर ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता. जान्हवीचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे ट्रोलर्स तिला जोरदार ट्रोल करत आहेत. जान्हवी कपूरच्या त्या पोस्टवर कमेंट करताना एका युजर्सने लिहिले की, "तू नाईटी घालून आली आहेस' तर दुसऱ्याने लिहिले की 'मला या लोकांचा ड्रेसिंग सेन्स समजत नाही.'

जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल भाष्य करायचे झाले तर ती लवकरच राजकुमार स्टारर मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय जान्हवी कपूर बॉम्बे गर्ल, गुड लक जेरी आणि बावल या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासोबतच जान्हवीकडे करण जोहरचा तख्त हा चित्रपटही आहे. या चित्रपटाची घोषणा खूप आधी झाली आहे. पण नंतर करण जोहरने हा चित्रपट मागे घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या. काही काळानंतर करणने असेही सांगितले की, चित्रपट अद्याप बंद झालेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी