Sridevi Death Anniversary: आई श्रीदेवींच्या पुण्यतिथीला भावुक होत मुलगी जान्हवी कपूरने शेअर केला इमोशनल फोटो

बी टाऊन
Updated Feb 24, 2020 | 19:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sridevi death Anniversary: दोन वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडमध्ये एक दुःखाचा दिवस पाहायला मिळाला. अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं त्याची आज आठवण करत मुलगी जान्हवी कपूरने एक इमोशनल फोटो शेअर केलाय.

janhvi kapoor shares an emotional throwback picture message on the occasion of her mother sridevi's 2nd death anniversary 
Sridevi Death Anniversary: आई श्रीदेवींच्या पुण्यतिथी वर भावुक होत मुलगी जान्हवी कपूरने शेअर केला इमोश्नल फोटो  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • श्रीदेवी यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी वर जान्हवीने शेअर केले फोटो
  • आईची आठवण काढत जान्हवी झाली भावुक
  • जुन्या आठवणी आठवत लिहिला इमोशनल कॅप्शन

मुंबई: 24 फेब्रुवारी 2018 हा दिवस बॉलीवूडसाठी काळा दिवस ठरला, सगळ्यांची लाडकी बॉलीवूडची प्रतिभावंत अभिनेत्री श्रीदेवी यांचं त्यादिवशी निधन झालं. दुबईच्या एका नामांकित हॉटेलमध्ये त्यांच्या रूममधील बाथटबममध्ये बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. ही बातमी येताच संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे वळलं होतं तर इंडस्ट्रीमध्ये एक शोककळा पसरली. श्रीदेवी यांच्या कुटुंबावर या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला. आज श्रीदेवी यांची दुसरी पुण्यतिथी आहे. त्यांच्या अतिशय जवळ असलेली त्यांची मोठी मुलगी जान्हवीने यानिमित्त श्रीदेवी यांची आठवण काढत एक इमोशनल फोटो शेअर केला आहे.

जान्हवीने शेअर केला आईसोबतचा फोटो

जान्हवीने श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या दोघींचा एकत्र असलेला एक जुना फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा थ्रोबॅक ब्लॅक अण्ड व्हाईट फोटो जान्हवीच्या लहानपणीचा असून त्यात ती आई श्रीदेवी सोबत छान खेळकर मूडमध्ये दिसून येते. एक गोंडस पोझ देत जान्हवीने आपल्या आईला बिलगून मिठी मारलेली या फोटोमध्ये दिसून येतं. माय-लेकी या फोटोमध्ये फारच खुश दिसून येत असून या फोटोला जान्हवीने एक इमोशनल कॅप्शन दिलं आहे. जान्हवी या कॅप्शन मध्ये म्हणते की, ‘तुला रोजच मिस करते...’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Miss you everyday

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

 

श्रीदेवी यांच्या खूप जवळ होती जानवी

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी आणि श्रीदेवी या दोघी एकमेकींच्या खूपंच जवळ होत्या. ज्या वेळेला श्रीदेवी यांचे निधन झालं तेव्हा जान्हवी भारतात असून आपल्या डेब्यू सिनेमा धडकच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी आपल्या लेकीचा पहिला सिनेमा देखील पाहू शकल्या नाहीत. अनेकदा जान्हवी श्रीदेवी यांचा फोटो शेअर करताना दिसते. गेल्यावर्षी श्रीदेवी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत जान्हवी तिरुपती देवळात दर्शनासाठी गेली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My angel

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

 

जान्हवीचे आगामी सिनेमे

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जान्हवीकडे सध्या बरेच सिनेमे आहेत. लवकरच गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा भारतीय लडाऊ पायलेट गुंजन सक्सेना यांचा बायोपिक असून कारगिल युद्धात त्यांच्या सक्षम  लढ्यावर आधारित आहे. सिनेमात तिच्यासोबत अंगद बेदी आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. सिनेमा येत्या 13 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

 

 

याव्यतिरिक्त जानवी हॉरर कॉमेडी हुई रूहीआफ्जाना या सिनेमात झळकताना दिसेल. या सिनेमात पहिल्यांदाच राजकुमार रावच्या अपोजिट जान्हवी दिसणार आहे. तसंच कार्तिक आर्यन सोबत दोस्ताना २ या सिनेमात सुद्धा जान्हवीची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा जॉन अब्राहम अभिषेक बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या दोस्ताना सिनेमाचा सिक्वेल असेल.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...