आई श्री देवीच्या बर्थडेसाठी तिरूपती मंदिरात पोहोचली जान्हवी कपूर

बी टाऊन
Updated Aug 13, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जान्हवू कपूर नुकतीच आपली आई श्री देवीच्या बर्थडे निमित्त तिरूपती मंदिरात पोहोचली. तिने या दरम्यानचा एक फोटोही पोस्ट केला आहे. यात साडी नेसलेली दिसत आहे.

janhvi kapoor
जान्हवी कपूर  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • जान्हवी कपूर आई श्री देवीच्या बर्थडे निमित्त पोहोचली तिरूपतीला
  • जान्हवीने तेथील फोटो केला शेअर
  • या फोटोत जान्हवी खूप सुंदर दिसत आहे.

मुंबई: आज १३ ऑगस्टला बॉलिवूडची दिग्गज दिवंगत अभिनेत्री श्री देवीचा बर्थडे आहे. या निमित्ताने तिच्या कुटुंबियांनी तसेच तिच्या चाहत्यांनी श्री देवीली बर्थ डेच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, श्री देवीची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवीनेही तिला शुभेच्छा दिल्या. इतकंच नव्हे तर आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी तिरूपतीला गेली. नुकतेच तिने तेथील फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोत जान्हवी पारंपारिक साऊथ इंडियन साडीमध्ये दिसत आहे. तिने गोल्डन आणि ग्रीन कलरची साडी नेसली आहे. विशेष म्हणजे जान्हवीने ही साडी साऊथ इंडियन स्टाईलने नेसली आहे. तिने आपला लूक बांगड्या आणि इअररिंग्सने अॅक्सेसराईज केला आहे. या दरम्यान तिने न्यूड लिपस्टिकसह सबटल मेकअप कॅरी केला आहे. तसेच तिने यावर टिकलीही लावली आहे. हेअरस्टाईलबाबत बोलायचे झाल्यास तिने सेंटर पार्टिंगसोबत आपल्या केसांना ब्रेडमध्ये बांधले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

?

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

या फोटोंमध्ये जान्हवीसोबत एक फ्रेंडही दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने यासोबत ग्रीन इमोजी शेअर केला आहे. जान्हवीच्या चाहत्यांना तिचा हा अवतार खूप आवडला आहे. याआधी जान्हवीने श्रीदेवीचा एक फोटो शेअर करून त्यांना बर्थडे विश केले होते. तिने लिहिले होते, हॅपी बर्थडे मम्मा, आय लव्ह यू. हा फोटो श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश सिनेमातील आहे. 

कामाच्या बाबत बोलायचे झाल्यास जान्हवी काही दिवसांपूर्वीच आपला सिनेमा रुहीआफ्जाचे आग्रामधील शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी आहे. यानंतर ती गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक कारगिल गर्लच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे. गुंजन सक्सेना या पहिल्या महिला भारतीय लढाऊ विमानाच्या पायलट होत्या ज्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता. याशिवाय जान्हवीकडे दोस्ताना २ आणि तख्त हे सिनेमेही आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday Mumma, I love you

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी सोशल मीडियावरही चांगलीच अक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. जान्हवीचा बऱ्याचदा जिम लूकही सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिचे जिम जातानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर अनेकदा तिचा पंजाबी ड्रेसमधीलही सोज्वळ लूक चाहत्यांना पाहायला मिळतो. जान्हवीने करण जोहरच्या धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत इशान खट्टरही होता. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. दरम्यान तिचा लवकरच दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...