Javed Khan Amrohi: 'लगान' सिनेमातील अभिनेता जावेद खान अमरोही यांचं निधन, वयाच्या 50व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Javed Khan Amrohi: बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले आहे. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Javed Khan Amrohi passes away in Mumbai bollywood film lagaan andaz apna apna fame actor
अभिनेता जावेद खान अमरोही यांचं निधन, वयाच्या 50व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन
  • जावेद खान अमरोही यांनी जवळपास 150 सिनेमांत भूमिका केली होती
  • गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते

Javed Khan Amrohi passes away: बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले आहे. ते 50 वर्षांचे होते. त्यांनी जवळपास 150 सिनेमांत भूमिका केली आहे. केवळ सिनेमांतच नाही तर अनेक टीव्ही मालिकांत त्यांनी भूमिका केली होती. आपल्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती.

अभिनेते जावेद खान अमरोही यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. मात्र, त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेजगतात शोककळा पसरली आहे. 'चंद्रकांता'चे अखिलेंद्र मिश्रा यांनी आपल्या फेसबूक हँडलवरुन अभिनेता जावेद खान अमरोही यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

हे पण वाचा : तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान

2001 मध्ये आलेल्या 'लगान' सिनेमात सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी जावेद खान अमरोही यांना अकादमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. 'अंदाज अपना अपना' आणि 'चक दे इंडिया' या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे सुद्धा जोरदार कौतुक झाले होते.

जावेद खान अमरोही यांच्या मृत्यूचं कारण काय?

जावेद खान अमरोही हे श्वसनाच्या आजाराशी पीडित होते. गेल्या वर्षभरापासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांच्यावर सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होम येथे उपचार सुरू होते. मंगळवारी (14 फेब्रुवारी 2023) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे

मुंबईत जन्म

जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांनी बॉलिवूडमध्ये सपोर्टिंग रोल याच्यासोबत कॅमिओ सुद्धा केलं होतं. जवळपास 15 सिनेमांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये आलेल्या 'जलते बदन' या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 'नूरी', 'पसंत अपनी अपनी', 'बाजार', 'रंग बिरंगी' यासारख्या सिनेमात भूमिका केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी