Jawan Movie Release date: बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार (Superstar) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)चित्रपट पठाणने (pathan) बॉक्स ऑफिसवर (Box office)धुमाकूळ घातला आहे. पठाणने प्रेक्षकांना चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलं. पठाणच्या यशानंतर शाहरुख खानचे पुढील दोन चित्रपट देखील अशीच कमाई करतील अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. यातील एक चित्रपट जवान आहे, या चित्रपटाचं अॅटलीने दिग्दर्शन केलं आहे. परंतु या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणार असल्याची बातमी हाती आली आहे. याचे प्रमुख कारण सलमान खानचा चित्रपट टायगर 3 सांगितले जात आहे, जो या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.( shahrukh khans jawan and dunki release date to get postponed due to salman khan tiger 3)
अधिक वाचा : टक्कल पडू नये यासाठी वापरा हे 10 सर्वोत्तम नैसर्गिक केस तेल
यावर्षाच्या जून महिन्यात जवान हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, मात्र त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ऑक्टोबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणखीन पुढे करण्यात येत असल्याची बातमी समोर येत आहे. सलमान खानचा टायगर 3 या चित्रपटामुळे जवान पडद्यावर येण्यापासून दूर राहणार आहे.
अधिक वाचा : मासिक पाळीच्या दरम्यान खाऊ नका ही फळं
बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार, शाहरुख खानचा चित्रपट जवान आणि डंकी हे दोघेही चित्रपट याचवर्षी दोन महिन्याच्या अंतराने प्रदर्शित होणार होते. परंतु एका मेगास्टारचे दोन मोठे चित्रपट एकत्र प्रदर्शित करणे ही मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे या वर्षी ऑक्टोबरमध्ये आधी जवान रिलीज होणार होता.
अधिक वाचा : black coffee वजन कमी करण्यास खरोखर आहे का उपयुक्त?
परंतु सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपटही नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. ज्यामध्ये शाहरुख खानचा कॅमिओ करणार आहे. यामुळे, आता अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, शाहरुख खानचा जवान आता ख्रिसमस 2023 ला रिलीज होऊ शकतो.
दुसरीकडे, शाहरुख खान आणि तापसी पन्नू स्टारर डंकी हा चित्रपट आता पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रदर्शित होऊ शकतो. डंकी हा चित्रपट मे किंवा जून 2024 मध्ये रिलीज केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. परंतु जवान आणि डंकी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची कोणतेही तारीख सांगितलेली नाही.