मुंबई: बॉलिवूडची ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री जया बच्चन(jaya bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. १९७३मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यानंतर जया बच्चन फारशा काही पडद्यावर दिसल्याच नाहीत. करण जोहरच्या कभी खुशी कभी गम आणि कल हो ना हो या सिनेमात जया यांनी काम केले होते. त्या शेवटच्या २०१२मधील सनग्लासेस मध्ये दिसल्या होत्या. यात त्या नसरूद्दीन शहासोबत होत्या. दरम्यान,हा सिनेमा काही रिलीज होऊ शकला नाही.
दरम्यान,जया बच्चन आता लवकरच मराठीत दिसणार आहेत. याआधी त्यांनी कधीच मराठीत काम केलेले नाही. त्यामुळे त्या मराठीत काम करणार म्हटल्यावर त्यांच्या चाहत्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना की जया बच्चन कोणत्या मराठी सिनेमात काम करणार आहे.
अनेक वर्षांनी त्या पुन्हा अभिनय करताना दिसणार आहे. तसेच मराठी सिनेमात तर त्या पहिल्यांदा दिसतील. या सिनेमाचे दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्द दिग्दर्शक गजेंद्र अहिरे करत आहे. गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत ५०हून अधिक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.. शेवरी, अनुमती तसेच द सायलेन्स या सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यामुळे जया बच्चन यांच्यासोबत गजेंद्र अहिरे कोणता नवीन सिनेमा घेऊन येत आहेत याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. मार्चमध्ये ते या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तसे २० दवसांत हा सिनेमा पूर्ण केला जाणार आहे.
जया बच्चन यांनी १९६३मध्ये रिलीज झालेल्या महानगर या सिनेमातून बॉलिवूडमद्ये पदार्पण केले. हा सिनेमा सत्यजीत रे यांनी केला होता. त्यावेळी त्यांचे वय १५ वर्षे होते. तेव्हापासून त्या या क्षेत्रात काम करत आहे.