Jaya Bachchan : "नव्या लग्नाशिवायच आई झाल्यास मला काहीच हरकत नाही", जया बच्चन यांचा नव्या नवेलीला बोल्ड सल्ला

बी टाऊन
Updated Oct 29, 2022 | 15:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jaya Bachchan advise : जया बच्चन(Jaya Bachchan) यांनी नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिच्या पॉडकास्ट What the hell Navya वर बोलताना रिलेशनशीपबाबत बोल्ड सल्ला दिला. जया बच्चन म्हणाल्या की, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण खूप महत्त्वाचे असते.

Jaya Bachchan bold advise to Navya naveli nanda
नातेसंबंधांवर जया बच्चन यांचा नातीला बोल्ड सल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नातेसंबंधाबाबत जया बच्चन यांचा नव्या नवेलीला बोल्ड सल्ला
  • लग्नाशिवाय नव्या आई झाल्यास हरकत नसल्याचं जया बच्चन यांचं मत
  • नातं टिकण्यासाठी शारिरिक आकर्षण गरजेचं असल्याचं जया बच्चन यांनी मांडला मत

Jaya Bachchan advise to Navya Naveli : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) त्यांच्या नातीसोबत एक खास बॉन्ड शेअर करतात. जया बच्चन अनेकदा नव्याबद्दल उघडपणे आपले मत मांडताना दिसतात. आता जया बच्चन यांनी आपल्या नातीला असाच एक नात्याबद्दल सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची खूप चर्चा होत आहे. काय म्हणाल्या जया बच्चन? चला जाणून घेऊया. (Jaya Bachchan bold advise to Navya naveli nanda)


फिजीकल रिलेशनशीपवर काय म्हणाल्या जया बच्चन?

जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्ट What the hell Navya वर बोलताना रिलेशनशीपबाबत बोल्ड सल्ला दिला. जया बच्चन म्हणाल्या की, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण खूप महत्त्वाचे असते. तसंच जया बच्चन म्हणाल्या आमच्या काळात असा प्रयोग आम्हाला करता आला नाही. 

अधिक वाचा : फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणारा Smartphone

त्यांच्या काळात प्रयोग करता आला नाही, असेही जयला म्हणाली. नात्यात शारिरीक आकर्षण असणं गरजेचं असतं असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणतंही नातं केवळ प्रेम, हवा आणि Adjustment वर टिकत नाही. नव्या नवेली जर लग्न न करताच आई झाली तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असेही जया बच्चन म्हणाल्या. एवढंच नाही तर, जया बच्चन असंही म्हणाल्या की "हे मत अनेकांना पटणार नाही. पण नात्यात शारिरीक आकर्षण आणि कंपॅटिबिलीटी दोन्ही गरजेचं आहे. आम्ही आमच्यावेळी असं experiment करू शकत नव्हतो, हल्लीची पिढी ते करते आणि काय करू नये? शारिरिक आकर्षणचं नसेल तर कोणतही नातं दीर्घ काळ टिकू शकत नाही. कोणतंही नातं केवळ प्रेम, हवा आणि Adjustment वर टिकत नाही. 

नव्या पिढीच्या नाते संबंधावर सांगितलं असं काही

जया म्हणाल्या, "आम्ही हे कधीच करू शकलो नाही. आम्ही याचा विचारही करू शकत नव्हतो. मात्र, श्वेताची पिढी, नव्याची पिढी वेगळी आहे." तसेच जया बच्चन यांनी नव्या पिढीला नातेसंबंधांबाबत एक सल्लाही दिला, "नव्या पिढीच्या नात्यांमध्ये  भावना आणि प्रेम यांचा अभाव आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्या जिवलग मित्राशी लग्न करावं. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी याबाबत बोलायला हवं, तुम्हाला जर तुमचा मित्र आवडत असेल, तर त्याला तुम्ही सांगायला हवं की, "मला असं वाटतं आपल्या दोघांचं बाळ असावं, कारण तू मला आवडतोस, आपण लग्न करू या. लग्नाशिवाय मूल झाल्यास मला काहीच प्रॉब्लेम नाही". जया बच्चन यांनी हा सल्ला आपल्या नातीला अर्थातच नव्या नवेलीला दिला आहे. 

अधिक वाचा :  ड्रग्स प्रकरणात भारती अन् हर्षच्या अडचणी वाढणार

आता नव्या नवेली आजीने दिलेल्या सल्ल्यानुसार वागणार का? ते येणाऱ्या काळत कळेलंच. मात्र, नातेसंबंधांवर जया बच्चन यांचं हे बोल्ड मत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खूप जणांनी यावर कमेंट्सही केलेल्या आहेत. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी