Jimmy Shergill Son : जिमी शेरगिलचा मुलगा वीरला ओळखणे कठीण, फोटो पाहून चाहते थक्क झाले

बी टाऊन
Updated Aug 19, 2022 | 23:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jimmy Shergil Son : जिमी शेरगिलचा ( Jimmy Shergill ) मुलगा वीर शेरगिलचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Photo viral ) होत आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे.

Jimmy Shergill son veer Shergill photos viral on social media
जिमी शेरगीलच्या मुलाचा फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिमी शेरगीलच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • जिमीच्या मुलाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
  • माचीस सिनेमातून जिमीने केली बॉलिवूड करिअरला सुरूवात

Jimmy Shergil Son : जिमी शेरगिल ( Jimmy Shergill ) हा एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. जिमी शेरगिलला बॉलिवूडचा ( Bollywood ) चॉकलेट बॉय देखील म्हटले जाते. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. जिमी शेरगिल सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांशी जोडलेला आहे. जिमी अजूनही पूर्वीसारखाच गोंडस आणि देखणा दिसत आहे. जिमी शेरगिलची मुलेही त्याच्यासारखीच झाली आहेत. जिमी शेरगिलचा मुलगा वीर शेरगिलचा एक फोटो सोशल मीडियावर (Photo viral ) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. ( Jimmy Shergill son veer Shergill photos viral on social media )


जिमी शेरगिलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा मुलगा वीर शेरगिलचा फोटो शेअर केला आहे. वीरच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त जिमी शेरगिलने हे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तुम्ही वीरला जिममध्ये पाहू शकता. यामध्ये तो त्याची शानदार बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. 

अधिक वाचा : मुंबईत २३ गोविंदा गंभीर जखमी

दुसऱ्या फोटोत तो शेरवानीमध्ये दिसत आहे. दोन्ही फोटोंमध्ये वीर खूपच क्यूट दिसत आहे. वीरच्या लूकने मुलींना आधीच भुरळ घातली आहे. या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले आहे.

अधिक वाचा : अश्लिल फोटोंमुळे BJP चा मोठा नेता हनीट्रॅपच्या जाळ्यात

फोटोवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, "तुमचा भाऊ छान दिसत आहे सर". तर दुसऱ्याने लिहिले, "हा तुमचा मुलगा आहे". अशातच लोक जिमी शेरगिलच्या मुलाच्या फोटोवर लाइक्सचा वर्षाव होत आहे. जिमी शेरगिलबद्दल सांगायचे तर, त्याने 2005 मध्ये 'माचीस' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर तो दिल है तुम्हारा, तनु वेड्स मनू, मेरे यार की शादी है, साहेब बीवी आणि गँगस्टर सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी