Jitendra Awhad : बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा ( Aamir Khan ) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha movie) सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला हा सिनेमा रिलीजआधीही सोशल मीडियावर (Social Media ) बराच चर्चेत होता. या सिनेमावर बहिष्कार घालण्यासाठी ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. प्रेक्षकांनी या सिनेमाकेड पाठ फिरवल्याने बॉक्स ऑफिसची गणितंसुद्धा कोलमडली. मात्र,अनेक सेलिब्रिटींनी सिनेमाला पाठींबा दिला आहे. आणि आता त्यात राजकारण्यांनीही उडी घेतलीय. ( Jitendra Awhad support laal singh chaddha trolled for mistake on twitter)
‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ बाबत याआधी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपलं मत मांडलं होतं. आता डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. मात्र, हे ट्विट करताना त्यांच्याकूडन एक मोठी चूक झाली आणि त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. जितेंद्र आव्हाड यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच ट्वीट डिलीट केलं.
अधिक वाचा : 'Emergency'सिनेमाील मिलिंद सोमणचा फर्स्ट लूक
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, “भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा, त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ने जास्त पैसा कमावला.
७.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे साधारण ६००० कोटी रुपये! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. हॅशटॅग फेक बॉयकॉट.” असं ट्वीट त्यांनी केलं.
अधिक वाचा : सचिनने इटालियन पास्तावर मारला ताव!
मात्र, हे ट्विट करताना अंकांमध्ये मोठी गडबड त्यांनी केली. 7.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 6000 कोटी नव्हे तर 60 कोटी रुपये होतात. जितेंद्र आव्हाड यांना ही चूक खूपच महागात पडली. नेटकऱ्यांनी त्यांना लगेच ट्रोल करायला सुरुवात केली. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. आव्हाड यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्विट लगेच डिलीट केले. मात्र, त्यांनी लाल सिंग चड्ढा या सिनेमाला पाठिंबा दिलेला आहे.