बाटला हाऊस सिनेमासाठी जॉन अब्राहमने केलं 'हे' काम, सिनेमा रिलीजपूर्वी केला खुलासा

बी टाऊन
Updated Aug 12, 2019 | 21:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा नवीन चित्रपट बाटला हाऊस रिलीजला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे.

batla house
बाटला हाऊस  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा सिनेमा खूपच चर्चेत आहे. या सिनेमामध्ये जॉन अब्राहमसह मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिमेमाचा ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. २००८ मध्ये दिल्ली येथे झालेल्या चकमकीवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजीव कुमार यादव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी आपला बराच वेळ संजीव कुमार यादव यांच्याबरोबर 'बटला हाऊस' सिनेमाच्या तयारीसाठी घालवला. या दरम्यान या दोघांनी संजीव कुमार यांच्या घरी 'कुराण' वाचले होते. वास्तविक हे पुस्तक त्यांच्या ग्रंथालयात ठेवले होते. १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिद्दीनचे चार अतिरेक्यांमध्ये चकमक झाली होती. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार यांचा खात्मा करण्यात यश आलं. तर या कारवाई दरम्यान विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले.


संजीव कुमार यादव यांनी सांगितले की, या प्रकरणावर काम करत असताना चौकशी दरम्यान संशयितांनी कुराणचे काही भाग वाचले जे त्यांना समजले नाही. यासाठी त्यांनी कुराण चांगले वाचले होते. ते पुढे म्हणाले की, पुस्तक वाचल्यानंतर संशयितांशी बोलणे सोप झालं होतं, याद्वारे त्यांची मनःस्थिती समजू शकलो. हा किस्सा ऐकल्यानंतर, सिनेमाची तयारी करत असताना जॉन अब्राहमने 'कुराण' वाचले आणि त्यातील काही गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. जॉन अब्राहमच्या मते, 'जेव्हा आपण एखादी भूमिका करतो तेव्हा त्या भूमिकेला समजून घेणं आवश्यक असतं. अशा परिस्थितीत तो काय विचार करतो हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.' हा सिनेमा येत्या १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

१३ डिसेंबर २००८ मध्ये दिल्लीमध्ये अनेक बॉम्ब स्फोट झाले. त्यात २६ जण ठार आणि सुमारे १३३ लोक जखमी झाले होते. यानंतर १ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या स्पेशल सेलने एका कारवाईत बाटला हाऊसमधील फ्लॅटवर छापा टाकला होता. ज्यामध्ये दोन कथित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, परंतु नंतर ही चकमक बनावट होती अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं हे या चित्रपटातून समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी