जॉन अब्राहम अशी करणार कोरोनाग्रस्तांना मदत

बी टाऊन
Updated Apr 30, 2021 | 16:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

जॉन अब्राहम(John Abraham) ने आपले सोशल मीडिया अकाऊंट्स एनजीओच्या सुपूर्द केले आहेत. जॉनने स्वत: याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

john abraham
जॉन अब्राहम अशी करणार कोरोनाग्रस्तांना मदत 

थोडं पण कामाचं

  • जॉन अब्राहम(John Abraham) नेही आता मदतीचा हात पुढे केला आहे.
  • ज़ॉन अब्राहमचा सिनेमा सत्यमेव जयते २ ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता.
  • सिद्धांत आनंद यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचे शूटिंग जॉनने यशराज स्टुडिओमध्ये सुरू केली होती.

मुंबई: कोरोनाचा कहर भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दर दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या संकटकाळात अनेक सेलिब्रेटी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून येत आहेत. जॉन अब्राहम(John Abraham) नेही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने आपले सोशल अकाऊंट्स एनजीओच्या स्वाधीन केले आहेत. जॉनने स्वत: याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.(john abraham will help to corona patients)

जॉनने लिहिले, आमचा देश सध्या मोठ्या संकटाविरुद्ध लढत आहे. दर मिनिटाला कोणत्या ना कोणत्या व्यक्ती ऑक्सिजन, आयसीयू बेड, वॅक्सीन आणि खाद्यपदार्थांची गरज पडत आहे.दरम्यान, या कठीण काळात आपण सगळे एकमेकांना साथ देत आहोत. जॉनने पुढे लिहिले की, आजपासून मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊट्स आमचे सहकारी एनजीओच्या स्वाधीन करत आहे. माझ्या अकाऊंटवरून तोच कंटेट पोस्ट केला जाईल ज्यामुळे गरजवंताना मदत मिळेल. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी माणुसकीची गरज आहे. या युद्धाविरुद्ध जिंकण्यासाठी आम्ही काहीही करू. घरी राहा आणि सुरक्षित राहा. 

सत्यमेव जयते २ ईदला रिलीज होणार नाही

ज़ॉन अब्राहमचा सिनेमा सत्यमेव जयते २ ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले. सिनेमाच्या मेकर्सनी स्टेटमेंट देत म्हटले, या संकटाच्या काळात जनतेची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेताना आम्ही आमचा आगामी सिनेमा सत्यमेव जयते २ ची निर्धारित तारीख पुढे ढकलत आहोत. सिनेमासंबंधित पुढील माहिती आम्ही देत राहू. तो पर्यंत सुरक्षित अंतर पाळा, मास्क लावा. आपली आणि इतरांची काळजी घ्या. जय हिंद. 

पठाण मध्येही दिसणार 

जॉन या शिवाय पठाण सिनेमातही दिसणार आहे. पठाणमध्ये जॉनशिवाय शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात जॉन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धांत आनंद यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचे शूटिंग जॉनने यशराज स्टुडिओमध्ये सुरू केली होती. शाहरूख खानच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती की त्याचे कमबॅक याच वर्षी होईल. मात्र त्याच्या चाहत्यांना आणखी एक वर्ष वाट पाहावी लागेल. यशराज यांच्या बॅनरखाली बनलेला हा सिनेमा २०२१मध्ये रिलीज न होता बॉक्स ऑफिसवर पुढील वर्षी येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी