Johnny Depp vs Amber Heard: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp)आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड (Amber Heard) यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात कोर्टाने निकाल दिला आहे. या प्रकरणात जॉनी डेपच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलेला आहे. डेपला आता $15 दशलक्ष (1.5 अब्ज) नुकसान भरपाई मिळणार आहे. अंबरने आपली बदनामी केली हे कोर्टात जॉनी डेपने सिद्ध केले. तरीही काही प्रकरणांमध्ये कोर्टाने डेपला देखील दोषी ठरवले, म्हणून त्यालाही अंबर हर्डला $2 दशलक्ष नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे
अंबर हर्डने एका लेखात जॉनी डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. त्यानंतर जॉनीने मानहानीचा खटला दाखल केला. कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान अंबरने अभिनेत्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते. बळजबरीने लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोपही अंबर हर्डने केला होता.
अधिक वाचा : प्रेग्नन्सीनंतर करीनाने असं कमी केलं वजन
ज्युरीने अंबर हर्डसह जॉनी डेपला काही गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. त्यामुळे,हर्डलादेखील $2 दशलक्ष नुकसान भरपाई मिळेल.
सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल देताच डेपच्या वकिलांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. यावेळी ते भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.सर्वांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, डेपचे चाहतेही या निर्णयामुळे खूप खूश आहेत.
एक्स पत्नी अंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनी डेपने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या लांबलचक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,ज्युरींनी त्यांना त्यांचे आयुष्यचं परत दिले आहे.
या निर्णयावर अंबर हर्डने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे. कोर्टाचा निर्णय ऐकून वाईट वाटतंय, आपला अपेक्षाभंग झाल्याचंही हर्डने म्हटलंय,इतके पुरावे असूनही मी हारले, हे खूपच वेदनादायक आहे, असंही हर्डने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलेले आहे. पुरुषांविरोधात आवाज उठवणाऱ्या इतर महिलांनाही या निर्णयाचा धक्का बसणार आहे.
अधिक वाचा : KK यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार
जॉनी आणि अंबरने २०१५ मध्ये लग्न केले होते. याआधी दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर,2016 मध्ये अंबरने जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
2018 मध्ये एक लेख प्रकाशित झाल्यावर याची सुरुवात झाली. अंबरने त्यावेळी घरगुती हिंसाचाराचा उल्लेख त्या लेखात केला होता. यानंतर "पायरेट्स ऑफ द कॅरिबियन"(Pirates of the Carribean) स्टार डेपने डिसेंबर 2018मध्ये ऑप-एडमध्ये फेअरफॅक्स काउंटी सर्किट (Fairfax County Circuit Court) कोर्टात हर्डविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रात डेपला घरगुती अत्याचाराचे प्रतिनिधित्व करणारी सार्वजनिक व्यक्ती म्हणून संबोधून अंबर हर्डने त्याची बदनामी केल्याचा युक्तीवाद डेपने केला होता. आणि अंबर हर्डविरोधात मानहानीचा दावा केला.