Jr NTR luxury life: आपल्या luxury लाईफस्टाईलमुळे (luxury lifestyle) ओळखला जाणारा अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR). सिनेमांपेक्षा राजकीय पार्श्वभूमीमुळेच ते कायम चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची हैदराबादमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं होतं. ज्युनियर एनटीआर पहिल्यांदा 2009 मध्ये टीडीपीचा प्रचार करताना दिसले होते. त्याच वर्षी मार्चमध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना ज्युनियर एनटीआरचा सूर्यापेट,नलगोंडा येथे अपघात झाला. त्यांचे वडील हरिकृष्ण यांचेही वर्षभरापूर्वी याच भागात अपघाती निधन झाले होते. प्रत्येक वाहनाच्या नंबर प्लेटवर 9 लिहिणाऱ्या ज्युनियर एनटीआरसाठी 2009 मात्र अशुभ ठरले असंच म्हणावं लागेल. आधी अपघात, त्यानंतर टीडीपीसाठी प्रचार करूनही फक्त 92 जागा मिळाल्या. मात्र, ज्युनिअर एनटीआर अतिशय लक्झरी आयुष्य जगतायेत. ( Jr NTR luxurt life 12 thousand fans attended marriage 100 crore spend)
हैदराबादमधील सर्वात पॉश एरियापैकी एक म्हणजे जुबली हिल्स. या भागात ज्युनियर एनटीआर यांचे आलिशान घर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे. राम चरण, महेश बाबू, अल्लू अर्जुन यांसारखे दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे शेजारी आहेत. या आलिशान घराशिवाय ज्युनियर एनटीआर यांच्याकडे हैदराबाद,बंगळुरू आणि कर्नाटकमध्येही मालमत्ता आहेत.
अधिक वाचा : रणवीर सिंह भोंगळा का झाला? जाणून घेण्यासाठी 2 तास चौकशी
एसएस राजामौली यांच्या आरआरआर या सिनेमात ज्युनियर एनटीआर झळकले होते. राम चरण आणि एनटीआर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 1200 कोटी रुपये आहे. या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम केलेले आहेत. ज्युनियर एनटीआर हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ते एका सिनेमासाठी जवळपास 20 कोटी रुपये घेतात. आरआरआर या सिनेमासाठी मात्र त्यांनी 45 कोटी रुपये म्हणजेच दुप्पट मानधन घेतले होते.
ज्युनियर एनटीआरने एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांचा लकी नंबर 9 आहे. यामुळेच त्यांनी त्यांच्या सर्व वाहनांमध्ये ९९९९ नंबर प्लेट्स लावल्या आहेत. BMW कारसाठी 9999 नंबर मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल 11 लाख मोजले होते.
लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग- ज्युनिअर एनटीआर यांच्याकडे असलेल्या आलिशान गाड्यांपैकी एक म्हणजे लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग. Jr NTR यांच्याकडे असलेल्या या कारची किंमत 2.31 कोटी ते 3. 41 कोटी आहे.
पोर्श 718 केमन- ज्युनियर एनटीआरच्या या कारची किंमत 1.22 कोटी आहे. ही आलिशान कार 13.51 kmpl मायलेज देते.
अधिक वाचा : टाइम्स म्झुझिकचे 'व्हॉट द लक' Rocking Party Song आऊट
BMW 720LD- ही सेडान कार एनटीआर यांच्याकडे असलेल्या गाड्यांपैकी एक आहे. याची किंमत सुमारे 1.42 कोटी ते 2.46 कोटी इतकी आहे. ही एक आलिशान गाडी असून सुखसोयींनी समृद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 80 कोटी रुपयांच्या खासगी जेटचे मालक आहे. त्यांचे चार्टर शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे.
ज्युनियर एनटीआर यांनी २०११ मध्ये तेलगू वाहिनीचे मालक नरणे श्रीनिवास यांची मुलगी लक्ष्मी प्रणतीशी लग्न केले. दोघांचा साखरपुडा झाला ते लक्ष्मी प्रणती अवघ्या 17 वर्षांची होती. लग्नाची बातमी आल्यानंतर अभिनेत्याविरुद्ध बालविवाह कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे, वाद टाळण्यासाठी, प्रणतीची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 5 मे 2011 रोजी या दोघांनी लग्न केले.
लग्नाचा खर्च जवळपास 100 कोटी रुपये झाला होता, तर जवळपास 12 हजार चाहत्यांनी एनटीआर यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नाला 15 हजार पाहुणे आले होते. त्यापैकी 12 हजार त्यांचे चाहते होते आणि बाकीचे देशभरातील मोठे राजकारणी आणि व्यापारी होते. आजही ज्युनियर एनटीआरचे लग्न देशातील सर्वात भव्य लग्नसोहळ्यांपैकी एक मानले जाते. त्यांचे लग्न एका टीव्ही चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात आले. ज्युनियर एनटीआर आणि प्रणती यांच्या लग्नाला 11 वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत.
अधिक वाचा : जिओ ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन! अमर्यादित कॉलिंग, डेटा...
2004 मध्ये ज्युनियर एनटीआर यांच्या अंड्रावाला सिनेमाच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटला दहा लाख लोक पोहोचले होते. या संगीत कार्यक्रमाला इतके लोक येतील याची कुणालाही कल्पना नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार - इतक्या जणांच्या अचानक येण्याने 9 स्पेशल ट्रेन त्यावेळी चालवण्यात आल्या होत्या.
2013 मध्ये ज्युनियर एनटीआर यांचा बादशाह सिनेमा आला होता. यावेळी प्रत्येक म्युझिक लाँच कार्यक्रमाप्रमाणेच या कार्यक्रमालाही तुफान गर्दी होती. यावेळी चेंगराचेंगरीत एका चाहत्याचा मृत्यू झाला. एनटीआर यांना हे समजताच त्यांनी त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलली. तसेच त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयेही दिले.
भारताप्रमाणेच जपानमध्येही ज्युनियर एनटीआर यांचा जलवा आहे. जपानमध्ये त्यांचं फॅन फॉओइंग खूप आहे. त्यांचे डान्स आणि डायलॉग्ज रिक्रिएट करून अनेकदा ते सोशल मीडियावर शेअर केले जातात. 2014 मध्ये राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'ओसाका'साठी एनटीआर यांचा बादशाह सिनेमा पाठवण्यात आला होता. भाग मिल्खा भाग नंतर भारतातील हा सिनेमा आहे जो या फिल्म फेस्टीव्हलमध्ये पाठवण्यात आला होता.