Jr NTR will be charging more than Hrithik Roshan for War 2 : यशराज फिल्म्स या बॅनर अंतर्गत आदित्य चोप्रा 'वॉर टू' (WAR 2) या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 'वॉर टू' सिनेमासाठी हृतिक रोशनपेक्षा दुप्पट पैसे ज्युनिअर एनटीआरला मिळणार असल्याचे वृत्त आहे.
एसएस राजामौली यांच्या आरआरआर या सिनेमाला ऑस्करसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यामुळे आरआरआर या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्युनिअर एनटीआरचे मनोरंजनसृष्टीतले महत्त्व वाढले आहे. वाढत्या लोकप्रियतेचा अंदाज आल्यामुळे ज्युनिअर एनटीआरने 'वॉर टू' सिनेमासाठी हृतिक रोशनपेक्षा जास्त पैसे मागितल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'वॉर टू' सिनेमासाठी हृतिक रोशनपेक्षा दुप्पट पैसे ज्युनिअर एनटीआरला मिळणार आहेत.
यशराज फिल्म्स 'वॉर टू' सिनेमाद्वारे ज्युनिअर एनटीआरला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. याआधी ज्युनिअर एनटीआरने केलेल्या दाक्षिणात्य सिनेमांचे हिंदीत डबिंग झाले आहे. पण ज्युनिअर एनटीआरने कधीही हिंदी सिनेमात काम केलेले नाही. पहिल्यांदा 'वॉर टू' सिनेमाच्या निमित्ताने ज्युनिअर एनटीआर बॉलिवूडसाठी काम करणार आहे. हे लाँचिंग यशस्वी व्हावे यासाठी यशराज फिल्म्स तयारी करत आहे.
'वॉर टू' सिनेमातून ज्युनिअर एनटीआर आणि हृतिक रोशन या दोघांची झुंज बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर स्पेशल इफेक्ट्स आणि दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी अशा स्वरुपात एक उत्तम मनोरंजन अनुभवण्याची सुवर्णसंधी 'वॉर टू' सिनेमामुळे प्रेक्षकांना मिळेल, असे यशराज फिल्म्सच्या टीमचे म्हणणे आहे.
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेला 'वॉर' हा हिंदी सिनेमा ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाने 475 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला. ब्लॉकबस्टर (Blockbuster) सिनेमांच्या यादीत 'वॉर' या सिनेमाचा समावेश त्यावेळी झाला होता. यामुळेच 'वॉर टू' या हिंदी सिनेमाकडून जास्त अपेक्षा आहेत.
एक सवय बदलून परिणीतीने घटवले वजन