Jug Jugg Jeeyo Box Office Collection Day 9: जुग जुग जिओच्या कमाईत वाढ, दुसऱ्या शनिवारी ५६ टक्क्यांनी वाढ

बी टाऊन
Updated Jul 03, 2022 | 22:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jug Jugg Jeeyo Box Office Collection Day 9: वरुण धवन, किया अडवाणी यांच्या जुग जुग जिओ या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या शनिवारी मोठी वाढ झाली आहे. नऊ दिवसांनी चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घ्या.

Jug Jug Geo's earnings up 56 per cent on second Saturday
जुग जुग जिओच्या कमाईत वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जुग जुग जिओची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या शनिवारीही चांगली कमाई
  • जुग जुग जिओने दुसऱ्या शनिवारनंतर 65 कोटींच्या कलेक्शनच्या जवळ पोहोचले आहे.
  • नवीन चित्रपट रिलीज झाल्याचा जुग जुग जिओवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Jug Jugg Jeeyo Box Office Collection Day 9: वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचा 'जुग जुग जिओ' हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. दुसऱ्या शनिवारीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. त्याच वेळी, आर माधवनचा चित्रपट रॉकेट्री: द नंबी इफेक्ट आणि आदित्य रॉय कपूरचा चित्रपट राष्ट्रकवच ओम, जो या आठवड्यात रिलीज झाला, याचाही जुग जुग जिओच्या कमाईवर परिणाम झाला नाही. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईने 60 कोटींचा आकडा पार केला आहे.


व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, जुग जुग जिओ या सिनेमाने पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. शनिवारी व्यवसायात 56.77 टक्के वाढ झाली आहे. या चित्रपटाची मेट्रोमध्ये चांगली कामगिरी होत असून जास्तीत जास्त व्यवसाय मेट्रोमधून होत आहे. दुसऱ्या रविवारी हा चित्रपट ६५ कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे.जुग जुग जिओने दुसऱ्या शुक्रवारी ३.०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवारी 4.75 कोटी रुपये जमा झाले आहेत. चित्रपटाची एकूण कमाई 61.44 कोटींवर गेली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि जयपूरमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

व्यापार विश्लेषक सुमित कडेल यांच्या मते, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाचे संध्याकाळ आणि रात्रीचे शो बहुतेक शहरांमध्ये चांगले आहेत. हा चित्रपट भारतात लाइफटाइम 75 ते 80 कोटी कमवू शकतो. त्याचवेळी, बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, चित्रपट 80 ते 85 कोटींचा गल्ला जमवू शकतो. जुग जुग जिओने अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे.


जुग जुग जिओमध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा कुटुंब, घटस्फोट आणि बिघडलेले नाते याभोवती फिरते. 'जुग जुग जिओ' देशात 3375 स्क्रीन्सवर तर परदेशात 1014 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी