Juhi and Srk's Friendship: जुही चावलाने शेअर केली शाहरुख खानसोबतची सिक्रेट्स, जुही-शाहरुखची अशीही दोस्ती.

बी टाऊन
Updated Jan 13, 2022 | 14:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Juhi Chawla shares her dark secrets with Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान आणि जुही चावला यांची दोस्ती जगजाहीर आहे. एका मुलाखतीत जुहीने शाहरुखसोबतची काही खास सिक्रेट्स शेअर केली.

 Juhi Chawla shares her dark secrets with Shahrukh Khan
जुही चावलाने शेअर केली शाहरुख खानसोबतची सिक्रेट्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शाहरुख आणि जुही चावला म्हणातात, ''ही दोस्ती तुटायची नाय''
  • शाहरुख खान आणि जुही चावलाची अजब-गजब दोस्ती
  • जुहीने शेअर केली शाहरुख खान सोबतची सिक्रेट्स

Juhi Chawla shares her dark secrets with Shahrukh Khan: जुही चावला बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. जुहीने तिच्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. जुहीने तिच्या करिअरमध्ये ऋषी कपूरपासून शाहरुख खान, अनिल कपूरपर्यंत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये जुहीने एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत.

Juhi Chawla pledges to plant 500 trees in Shah Rukh Khan's name on his birthday | Hindi Movie News - Times of India

दुसरीकडे, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुखनेही आपल्या करिअरमध्ये बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. 
शाहरुख खानने रेखापासून अनुष्का शर्मापर्यंत प्रत्येक अभिनेत्रीसोबत काम केले आहे. आणि शाहरुखचे सर्वच अभिनेत्रींसोबतचे संबंध खूप चांगले आहेत. जुही आणि शाहरुखच्या नात्याबद्दल सांगायचं झालं, तर जुही शाहरुखची खूप चांगली मैत्रीण आहे. या दोघांची जोडी सुपरहीट आहे. दोघांनी अनेक हीट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत.
जुही चावला आणि शाहरुख खान वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

Juhi Chawla shares a throwback picture with Shah Rukh Khan on Instagram | Hindi Movie News - Times of India

दोघांनी डर, येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्तानी, राजू बन गया जेंटलमन, राम जाने आणि डुप्लिकेट अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, दोघेही बऱ्याच दिवसांपासून ऑनस्क्रीन एकत्र दिसले नाहीत. जुही अजूनही फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण हे नातं इथेच संपत नाही, जुहीची मुलगी जान्हवी मेहता आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान देखील खूप चांगले मित्र आहेत, 

Juhi Chawla recollects not being impressed by Shah Rukh Khan's looks when she first saw him on the sets of 'Raju Ban Gaya Gentleman' | Hindi Movie News - Times of India
जुही शाहरुखची खूप चांगली मैत्रीण आहे त्यामुळे जुहीला शाहरुखच्या प्रत्येक चांगल्या वाईट सवयींची माहिती आहे. आणि अलीकडेच जुहीने शाहरुख खानच्या एका सवयीबद्दल खुलासा केला. आणि शाहरुखच्या या काही सवयी तिलाही अजिबात आवडत नाहीत. जुहीने सांगितले की, 'एकदा तिच्या घरी एक पार्टी होती, ज्यामध्ये शाहरुख खानला बोलावण्यात आले होते. त्याला रात्री 11 वाजता पार्टीसाठी बोलावण्यात आले होते मात्र शाहरुख खान पहाटे 2:30 वाजता पोहोचला.

Shah Rukh Khan and Juhi Chawla to come together for Aanand L. Rai's film?

आणि हा किस्सा शेअर करताना जुही म्हणाली, “जेव्हाही घरात पार्टी असते तेव्हा आम्ही शाहरुखला नक्कीच फोन करतो. अशाच एका पार्टीसाठी मी शाहरुखला आमंत्रित केले होते आणि त्याला भेटण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक होते. विशेषत: माझे कर्मचारी कारण त्यांना त्यांच्यासोबत फोटो काढायचे होते. "जुही चावलाने पुढे सांगितले की, “मी शाहरुखला सांगितले की तू 11:00 पर्यंत ये, थोड्यावेळाने  त्याने सांगितले की मला यायला थोडा उशिर होईल, त्यानंतर तो थेट पहाटे 2:30 वाजता आला, यावेळी पार्टी संपली होती. कर्मचारीही घरी गेले होते, जेवणही संपले होते आणि मीसुद्धा झोपले होते.

जुही चावलाने शाहरुख खानचे हे गुपित उघड करताच, दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खाननेही एक जुना किस्सा सांगितला, “आम्हाला हे माहित आहे की जर तुम्ही 9:00 ची शिफ्ट ठेवली तर शाहरुख 2:00 वाजता येईल पण ठीक आहे. मात्र, तो अचानक 11:00 वाजता येतो तेव्हा सारेच गोंधळतात, सगळाच गोंधळ होतो. मी म्हटलं की तू उशिरा येतोस ना, मग नेहमीच उशिरा का येत नाहीस? एकूणच काय, तर शाहरुख आणि जुहीची मैत्री पाहून ही दोस्ती तुटायची नाय असंच म्हणावं लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी