Actor Car Fire : सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग

K K Goswami Car Catches Fire While His Son Was Behind The Wheel, No Casualties : सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग लागली.

Actor Car Fire
सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग
  • मुंबईत गोरेगावमध्ये घडली घटना
  • आग लागण्याचे कारण अज्ञात, तपास सुरू

K K Goswami Car Catches Fire While His Son Was Behind The Wheel, No Casualties : सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग लागली. ही घटना मुंबईत गोरेगाव येथील सिटी सेंटर समोर घडली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावर (S. V. Road) सिटी सेंटर समोर प्रसिद्ध अभिनेता के के गोस्वामी यांच्या कारला आग लागली. आग लागली त्यावेळी कार अभिनेता के के गोस्वामी यांचा 21 वर्षांचा मुलगा चालवत होता. तो कार घेऊन कॉलेजला जात होता. 

आग लागलेली कार

कारला आग लागली त्यावेळी अभिनेता के के गोस्वामी यांचा मुलगा नवदीप कार चालवत होता. आग लागल्याचे लक्षात येताच तो कारमधून लगेच बाहेर आला. यामुळे नवदीपला काहीही झालेले नाही, तो सुखरुप आहे. पण आग लागल्यामुळे कारचे नुकसान झाले.

कारला आग लागल्याचे तातडीने अग्नीशमन दलाला (फायर ब्रिगेड) कळवण्यात आले. तातडीने आलेल्या अग्नीशमन दलाच्या पथकाने कारची आग विझवली. या प्रकरणी तपास सुरू आहे. आग लागण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

कोण आहे के के गोस्वामी?

अभिनेता के के गोस्वामी यांनी सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून काम केले आहे. सीआयडी, विकराल गबराल, गुटुर्गु या टीव्ही मालिका तसेच भूत अंकल ,पप्पू पास हो गया,राम सिंह चार्ली या सिनेमांमध्ये अभिनेता के के गोस्वामी यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेता के के गोस्वामी एका शूटिंगसाठी सोनभद्र येथे आहेत. 

उर्फी जावेदचे व्हायरल लूक्स

'पुष्पा 2' चे पोस्टर बघून चाहते म्हणाले 'फायर है'

अभिनेता के के गोस्वामी आणि त्यांचा मुलगा नवदीप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी