Kabir Singh Box office: २५० कोटींच्या क्लबमध्ये कबीर सिंग, ऑस्ट्रेलियामध्येही धुमाकूळ 

बी टाऊन
Updated Jul 10, 2019 | 20:10 IST

Kabir Singh Box office collection: शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग २१ जूनला रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमानं आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 

kabir singh
२५० कोटींच्या क्लबमध्ये कबीर सिंग,ऑस्ट्रेलियामध्येही धुमाकूळ  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • कबीर सिंग सिनेमा २५० कोटींच्या जवळपास
  • बुधवारपर्यंत सिनेमाची २४३ कोटींचं कलेक्शन
  • ऑस्ट्रेलियाच्या बॉक्स ऑफिसवरही सिनेमाचा जलवा

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा कबीर सिंग सिनेमा २१ जूनला रिलीज झाला.  रिलीज झाल्यानंतर या सिनेमा रोज दमदार कमाई करत आहे. या सिनेमानं रोज नवनवीन रेकॉर्ड ब्रेक केले. या सिनेमासाठी तरूण पिढीमध्ये खूप क्रेझ आहे. या सिनेमानं आता २५० कोटी रूपयांची जवळपास कमाई केली. फिल्म क्रिटिक तरण आदर्शनं कलेक्शनचा आकडा शेअर केला आहे. शेअर केलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत या सिनेमानं २४३.१७ कोटी रूपयांची कमाई केली. 

तरण आदर्शच्या माहितीनुसार, कबीर सिंग सिनेमानं बुधवारी विकी कौशलचा उरी या सिनेमाच्या कमाईला मागं सोडलं आहे. त्यानंतर हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. एवढंच नाही तर हा सिनेमा हिंदी सिनेमात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमाच्या यादीत उरीला मागं टाकून १० व्या स्थानावर आला आहे. तरण आदर्शनुसार, मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड यांचा सामना होता त्यामुळे या सिनेमानं ४.२५ कोटी रूपयांची कमाई केली. 

कबीर सिंग हा सिनेमा साऊथ सिनेमा अर्जुन रेड्डी या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. दिग्दर्शक संदीप वांगाचा सिनेमा अर्जुन रेड्डीनं साऊथमध्ये ही बरेच रेकॉर्ड ब्रेक केले. संदीपनेच कबीर सिंग सिनेमाची निर्मिती केली आणि त्यानं हा सिनेमा हुबेहुब अर्जुन रेड्डी सारखा बनवला. कबीर सिंग या सिनेमाला सामान्य जनतेकडून मिळणारे रिव्ह्यूज खूप लाभदायक ठरत आहेत. माउथ टू माउथ पब्लिसिटीमुळे या सिनेमाला मोठ्या संख्येनं दर्शक सिनेमा बघण्यासाठी येत आहेत. 

ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा जलवा 

हा सिनेमा ऑस्ट्रेलियन बॉक्स ऑफिसवर या वर्षांचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. फिल्म क्रिटिक तरण आदर्शनुसार, कबीर सिंगनं ऑस्ट्रेलियात ९५९,९९४ ऑस्ट्रेलियन डॉलरची कमाई केली आहे. या कमाईनंतर हा सिनेमा सर्वांत मोठा सिनेमा ठरला आहे. या सिनेमानं टॉपवर असलेल्या रणवीर सिंगचा गली बॉय, विकी कौशलचा उरी, सलमान खानचा भारत, वरूण धवनचा कलंक सिनेमाला मागं टाकले आहे. 

अशी आहे कबीर सिंग सिनेमाची कथा

साऊथचा सिनेमा अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर सिंग दिल्लीच्या एका मेडिकल स्टुडंट कबीर राजधीर सिंह (शाहिद कपूर) ची गोष्ट आहे. कबीर खूप रागीठ असतो. आपल्या रागावार त्याला बिल्कुल कंट्रोल नसतो. कबीरला आपली ज्युनिअर प्रितीसोबत प्रेम होते. कबीर कॉलेजमध्ये घोषित करतो की, प्रिती माझी आहे म्हणून. त्यानंतर कबीर कॉलेजमधून पास आऊट होऊन मसूरीला मास्टर्स करण्यासाठी जातो आणि प्रिती दिल्लीला असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कबीर लग्नाची मागणी घालण्यासाठी प्रितीच्या घरी जातो. तेव्ही प्रितीचे वडील त्याला घरातून हाकलतात. प्रितीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत करून देतात. कबीर प्रेम अयशस्वी झाल्यानंतर दारूडा होता. त्याला दारूचं भयंकर व्यसन लागतं. प्रिती त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली असते. तरी सुद्धा प्रितीला मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. प्रिती त्याच्या आयुष्यात पुन्हा येते की नाही हे, हीच आहे कबीर सिंग सिनेमाची कथा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Kabir Singh Box office: २५० कोटींच्या क्लबमध्ये कबीर सिंग, ऑस्ट्रेलियामध्येही धुमाकूळ  Description: Kabir Singh Box office collection: शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग २१ जूनला रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमानं आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles