Nyasa Devgan : काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणने डीप नेक ड्रेसमध्ये दिली पोज, चाहते घायाळ

बी टाऊन
Updated Jan 10, 2022 | 11:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nyasa Devgan : अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणची सध्या बॉलिवूडमध्ये खूपच चर्चा सुरु आहे. काही ना काही कारणाने ती कधी ट्रोल होत आहे, तर कधी आपल्या सौंदर्याने ती चाहत्यांना घायाळ करत आहे.

Nyasa Devgan posed in a deep neck dress, people are going crazy
न्यासा देवगणची हटके पोज, चाहते घायाळ  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • न्यासा देवगणच्या सौंदर्याने चाहते घायाळ
  • डीप नेक ड्रेसमधील न्यासाच्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष
  • न्यासा देवगणची बॉलिवूडमध्ये चर्चा

Nyasa Devgan's Viral Photos : बॉलिवूड सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतात. मात्र, आता हे स्टार किड्सही चर्चेत आहेत. सध्या अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. न्यासा आता खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचा लूक, तिची ड्रेसिंग स्टाईल, फोटोसाठी पोज, सर्व काही एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला शोभेल असंच आहे. नुकतेच तिचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आधीच सोशल मीडिया सनसनाटी, त्यात आता न्यासाचे हे बोल्ड अँड ब्युटिफुल फोटोज.

न्यासाच्या फॅन पेजवर तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओंमध्ये शेअर करण्यात आले आहेत. तिच्या एका बोल्ड फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यासाच्या एका फॅन पेजने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. न्यासाच्या या फोटोने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून चाहत्यांना तिच्या सौंदर्याची खात्री पटली आहे. फोटोमध्ये, न्यासा देवगनने क्रोशेटचा हिरवा क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. हा टॉप डीप नेक आहे, तिच्या या फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत. 

तर दुसरीकडे, या फोटोंमध्ये न्यासा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुललं आहे. कारणाने ट्रोल होत असतात. न्यासाचे हे लेटेस्ट फोटो तिच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये न्यासा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये ती त्याच्या मित्रांसोबत आहे. 

तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या गर्ल गँगसोबत दिसत आहे. न्यासाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत आणि कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. या लाल ड्रेसमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

काही दिवसांपूर्वी, हीच न्यासा सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. तिच्या रंगावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. मात्र, आता न्यासावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. न्यासा देवगण सध्या परदेशात तिचे शिक्षण पूर्ण करत आहे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती चित्रपटांमध्ये नक्कीच स्वत:चे नशीब आजमावेल असं म्हणायला हरकत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी