सासऱ्यांच्या निधनानंतर आता बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल

बी टाऊन
Updated May 29, 2019 | 09:11 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे सासरे वीरू देवगण यांचे निधन झाले. या दु:खातून बाहेर येत नाही तोच काजोलची आई अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

kajol and tanuja
काजोल आणि तनुजा 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे नुकतेच निधन झाले. मुंबईत २७मेला त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दु:खातून त्यांचे चाहचे बाहेर येत नाही तोच अजय  देवगणची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. 

काजोलचा एक फोटो समोर आला आहे ज्यात काजोल लीलावती रुग्णालयात दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, तिची आई आणि बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खराब आबे आणि त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल केले असून काजोल आपल्या आईला भेटण्यासाठी तेथे पोहोचली होती. दरम्यान, तिच्या आईच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

काजोलचा हा फोटो समोर आल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे सातत्याने कमेंट करून प्रश्न विचारून सगळं काही ठीक आहे की नाही याची चौकशी करत आहेत. काजोलचा हा इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून चाहते कमेंट करून विचारत आहे की ती रुग्णालयात का गेली आहे? सगळ ठीक आहे ना? तर काहींनी कमेंट केल्यास की त्यांच्या घरात काय सुरू आहे. दरम्यान, काहींनी आपल्या कमेंटमध्ये तिची आई तनुजा यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#kajoldevgan snaped at lilavati hospital today

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

२७ मेला वीरू देवगण यांची तब्येत बिघडली होती. मिळालेल्या माहितीनुसार वीरू देवगण घरी जेवत होते त्याचवेळी ते खुर्चीवरून खाली पडले. सासऱ्यांची तब्येत बिघडल्याने काजोलने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 

वीरू देवगण यांच्यावर विलेपार्लेच्या पश्चिमेला असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरू देवगण यांनी अनिता या सिनेमातून स्टंटमॅन म्हणून डेब्यू केले होते. यानंतर त्यांनी लाल बादशाह, प्रेमगंथ, दिलवाले, जिगर, शहेनशाह आणि मिस्टर इंडिया या सिनेमातून काम केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सासऱ्यांच्या निधनानंतर आता बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल Description: नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे सासरे वीरू देवगण यांचे निधन झाले. या दु:खातून बाहेर येत नाही तोच काजोलची आई अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles