Salaam Venky Trailer: 'सलाम वेंकी'चा Trailer out, काजोलसह झळकणार बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार

बी टाऊन
Updated Nov 14, 2022 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salaam Venky Trailer out : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) फिल्मी करिअरची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. काजोल बऱ्याच दिवसांनी सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. काजोलच्या सलाम वेंकी (Salaam Venky) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्रेलरमध्ये काजोलसोबत बॉलिवूडचा एक सुपरस्टारही दिसत आहे.

kajol movie Salam venky trailer out
काजोलच्या बहुप्रतीक्षित 'सलाम वेंकी'चा Trailer out  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काजोलच्या 'सलाम वेंकी' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
  • काजोलच्या या सिनेमाचा ट्रेलर खूपच भावूक आहे.
  • या सिनेमात बॉलिवूडचा एक सुपरस्टारही दिसणार आहे.

Salaam Venky Trailer out :  बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) फिल्मी करिअरची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. काजोल बऱ्याच दिवसांनी सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. काजोलच्या सलाम वेंकी (Salaam Venky) या सिनेमाचा ट्रेलर  नुकताच रिलीज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्रेलरमध्ये काजोलसोबत बॉलिवूडचा एक सुपरस्टारही दिसत आहे. (kajol movie Salam venky trailer out)

अधिक वाचा : 2023 मधील लग्नाचे मुहूर्त

बॉलिवूड अभिनेत्री काजोल बऱ्याच काळानंतर सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. काजोलच्या 'सलाम वेंकी' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर खूपच भावनिक आहे. सिनेमात आई आणि मुलाचे नाते उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहे. एक आजारी मुलगा ज्याला वाचवण्यासाठी आई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करते अशी सिनेमाची वनलाईन आहे.  सलाम वेंकीच्या ट्रेलरच्या शेवटी एक मोठे सरप्राईज देखील आहे. या सिनेमात काजोलसोबत बॉलिवूडचा सुपरस्टार दिसणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Kajol Devgan (@kajol)

अधिक वाचा : काय आहे कतरिनाच्या बेबी बंपमागचं सत्य?


काजोलचे सिल्व्हर स्क्रीनवर परतणार आहे

'सलाम वेंकी' या सिनेमातून अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर परतणार आहे. काजोल शेवटची तान्हाजी या सिनेमात अजय देवगण सोबत दिसली होती. या सिनेमात तिची भूमिका खूपच कमी होती. आता काजोलच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात काजोल एका आईची भूमिका साकारत आहे जिचा मुलगा एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. 'बाबू मोशाय...जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही' हा डायलॉग ऐकल्यावर अंगावर काटा येतो. एवढेच नाही तर ट्रेलरच्या शेवटी आणखी एक मोठे सरप्राईज आहे.

अधिक वाचा :  राज्यपालांना भेटून बाहेर आलेल्या जया बच्चन भडकल्या

आमिर खान आणि काजोल पु्न्हा एकत्र

काजोलच्या सिनेमात बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानचा कॅमिओ दिसणार आहे. ट्रेलरच्या शेवटी आमीर खान दिसत आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकताही वाढली आहे. या सिनेमात काजोल कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काजोलने सिनेमाचा ट्रेलर तिच्या इंस्टाग्राम अकऊंटवर शेअर केला आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी