दुसऱ्या दिवशी 'कलंक'ला बॉक्स ऑफिसवर झटका

बी टाऊन
Updated Apr 19, 2019 | 14:38 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट्ट यांचा सिनेमा कलंकने रिलीजच्या पहिल्या दिवशी २१.६० कोटी रूपयांची कमाई केली होती. हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला. 

kalank movie
कलंक सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट्ट यांचा 'कलंक' हा सिनेमा १७ एप्रिलला रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक २१.६० कोटी रूपयांची कमाई केली. यासोबतच यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाने अक्षय कुमारचा केसरी आणि रणवीर सिंहच्या गली बॉय या सिनेमाला मागे टाकले. पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केल्यांतर दुसऱ्या दिवशी कलंकची कमाई घटली. दुसऱ्या दिवशी गुरूवारी कलंक या सिनेमाने ११.४५ कोटी रूपयांची कमाई केली. याप्रकारे कलंकने दोन दिवसांत ३३.०५ कोटी रूपये कमावले. 

गुरूवारी वर्किंग डे असल्याने कमाई कमी झाली. फिल्म बिझनेस जाणकारांच्या मते, शनिवारी आणि रविवारी 'कलंक'च्या कमाईचा आकडा वाढू शकतो. या सिनेमाला समीक्षकांनी ठीक पसंती दिली आहे. तर अधिक समीक्षकांनी यावर टीका केली आहे. प्रेक्षकांनाही हा सिनेमा तितकासा आवडलेला नाही. १९४०च्या बॅकड्रॉपवर आधारित या सिनेमाची कहाणी आहे. यात वरूण धवन लोहारच्या भूमिकेत असून तो लग्न झालेल्या आलिया भट्टच्या प्रेमात पडतो. आलिया भट्ट आदित्य रॉय कपूरची पत्नी आणि संजय दत्तची सून आह. माधुरी दीक्षित या सिनेमात बेगम बहारच्या भूमिकेत आहे. तीचे संजय दत्तवर प्रेम असते. 

 

 

पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

पहिल्या दिवशी या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाने पहिल्या दिवशी २१.६० कोटी रूपयांची कमाई केली होती. महावीर जयंतीच्या निमित्ताने अनेकांना सुट्टी असल्याने याचा परिणाम सिनेमावर पाहायला मिळाला. समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाच्या कमाईचा आकडा ट्विटवरून शेअर केला होता. 

 

 

हीरा मंडीमध्ये इंग्रंजांना स्टील मशीन्स लावायच्या असतात. मात्र त्यासाठी तेथील स्थानिक लोहारांचा यास विरोध असतो. याच मंडीमध्ये वरूण धवन काम करत असतो. तर बेगम बहार यांची तेथे कोठी असते. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दुसऱ्या दिवशी 'कलंक'ला बॉक्स ऑफिसवर झटका Description: अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट्ट यांचा सिनेमा कलंकने रिलीजच्या पहिल्या दिवशी २१.६० कोटी रूपयांची कमाई केली होती. हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला. 
Loading...
Loading...
Loading...