Mirzapur 2: ... म्हणून वडिलांनी माझा एकही सिनेमा पाहिला नाही : पंकज त्रिपाठी

बी टाऊन
Updated Oct 17, 2020 | 12:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

अॅमेझॉन प्राईमवरची सर्वात लोकप्रिय आणि चर्चित वेबसीरीज मिर्झापूरचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसीरीजमध्ये कालीन भैय्याची मुख्य भूमिका करत आहेत पंकज त्रिपाठी.

Mirzapur season 2
मिर्झापूर सीझन २ 

थोडं पण कामाचं

  • अॅमेझॉन प्राईमवरच्या मिर्झापूरचा दुसरा सीझन लवकरच येणार
  • २३ ऑक्टोबर रोजी होणार मिर्झापूर २चे प्रीमियर
  • अभिनेते पंकज त्रिपाठी साकारत आहेत कालीन भैय्याची भूमिका

Pankaj Tripathi on Mirzapur 2: अॅमेझॉन प्राईमवरची (Amazon Prime) सर्वात लोकप्रिय आणि चर्चित वेबसीरिज (famous web-series) मिर्झापूरचा (Mirzapur) दुसरा सीझन (second season) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २३ ऑक्टोबर रोजी मिर्झापूर २चे प्रीमियर (Mirzapur-2 premier) होणार आहे. चाहते या प्रीमियरसाठी प्रचंड उत्साहात आहेत. या वेबसीरीजमध्ये कालीन भैय्याची (Kaleen Bhaiyya) मुख्य भूमिका निभावत आहेत दिग्गज अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi).

वडिलांनी पाहिलेला नाही एकही चित्रपट

पहिल्या सीझनमधल्या त्यांच्या भूमिकेची प्रचंड प्रशंसा झाली होती आणि दुसऱ्या सीझनच्या झलकांमध्येही त्यांचा अंदाज पहिल्यापेक्षाही जोरदार दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या पंकज त्रिपाठी यांनी आपल्या पात्रात प्राण फुंकले आहेत. आता ते नव्या सीझनसाठी सज्ज आहेत आणि सतत माध्यमांच्या समोरही येत आहेत. नुकतेच आपल्या आगामी मिर्झापूर २बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्यांच्या वडिलांनी आजपर्यंत त्यांचा एकही चित्रपट पाहिलेला नाही.

पंकज त्रिपाठी यांचा वडिलांशी नाही फारसा संवाद

‘स्पॉटबॉय’शी बोलताना पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमध्ये फारसा संवाद होत नाही. ते म्हणाले, ‘माझ्या आयुष्यात काय चालले आहे आणि का, याबद्दल ते बसून माझ्याशी बोलत नाहीत. त्यांनी मला कुठल्याही गोष्टीसाठी थांबवले नाही. मिर्झापूर सीरीजबद्दल त्यांना माहिती नसेल, कारण मी चित्रपटांमध्ये काम करतो हेही त्यांना ठाऊक नाही.’

पंकज त्रिपाठी यांच्या घरी टीव्हीही नाही

पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की जेव्हा ते घरी जातात, तेव्हा वडील विचारतात- ‘तुझे काम नीट चालले आहे ना?’ मी सांगतो की सर्व व्यवस्थित चालले आहे. त्यांनी माझा एकही चित्रपट पाहिलेला नाही. ते टीव्ही पाहात नाहीत. माझ्या गावी घर आहे तिथे आजही टीव्ही नाही. मी खूपदा म्हटले की टीव्ही लावून देतो, निदान माझे चित्रपट तरी पाहा, पण आई आणि वडिलांनी नको म्हटले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी