कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह

Kamal Haasan tests positive for COVID-19 दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेते कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Kamal Haasan tests positive for COVID-19
कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह
  • अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर झाला कोरोना
  • कमल हासन क्वारंटाइन

Kamal Haasan tests positive for COVID-19 नवी दिल्ली: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेते कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर केलेल्या चाचणीत कमल हासन यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. सध्या कमल हासन यांना क्वारंटाइन केले आहे. त्यांचे उपचार सुरू आहेत. 

अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर खोकला झाला म्हणून तपासणी केली. या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे कमल हासन यांनी ट्वीट करुन सांगितले. क्वारंटाइन झालो आहे आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत आहे. नागरिकांनी मास्क वापरावा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन कमल हासनने केले. 

चाहत्यांनी कमल हासन यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया दिल्या आहेत. काळजी घ्या, तब्येत सांभाळा; अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी कमल हासन यांच्या ट्वीटवर दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी कमल हासन लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

अभिनेते कमल हासन यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात १९६० मध्ये झाली. अनेक तेलुगु, तामिळ आणि हिंदी सिनेमांमध्ये कमल हासन यांनी भूमिका साकारल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी